सलमान खानने भाची आयतसोबत फार्महाऊसवर वाढदिवस केला साजरा, ‘या’ कलाकारांनी लावली हजेरी


बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) हा एक असा अभिनेता आहे, ज्याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. तो त्याच्या दबंग स्टाईलने सर्वांचेच मन जिंकून घेण्यास यशस्वी ठरला आहे. त्याच्या चित्रपटातील अभिनय चाहत्यांच्या मनाला वेड लावतो. सलमान सोमवारी (२७ डिसेंबर) त्याचा ५६वा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी त्याने त्याच्या पनवेल फार्महाऊसवर ग्रॅंड पार्टी दिली. या पार्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

सलमानच्या बर्थडे पार्टीचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यात तो त्याचा बॉडीगार्ड शेरासोबत पोझ देताना दिसत आहे. २७ डिसेंबरला सलमानसोबत त्याची भाची आयतचाही वाढदिवस आहे. त्यामुळे दोघांची नावे फार्महाऊसच्या सुंदर सजावटीत दिसली. या पार्टीचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सलमान आयतसोबत केक कापताना दिसत आहे.

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सलमान फार्महाऊसच्या बाहेर आला आणि मीडिया आणि फोटोग्राफर्सशी संवादही साधला. सलमानच्या वाढदिवसानिमित्त फार्महाऊसच्या बाहेर काही चाहते जमले होते. ज्यांना सलमान भेटला आणि त्यांच्यासोबत फोटोही काढले. चाहत्यांनी सलमानला एक सुंदर फोटोही भेट दिला, ज्यामध्ये तो त्याच्या आईसोबत दिसत आहे.

सलमानला स्पॉट करण्यासाठी पॅपराझी त्याच्या पनवेल फार्महाऊसबाहेर रात्री उशिरापर्यंत जमत होते. त्यांनी सलमानसाठी केकही आणला होता. सलमानने कोणालाही निराश केले नाही आणि सर्वांसोबत फोटोसाठी पोझ दिल्या. वाढदिवसानिमित्त ब्लॅक लेदर जॅकेटमध्ये सलमान खूपच सुंदर दिसत होता. पार्टीत आलेल्या पाहुण्यांसोबतही त्याने जोरदार पोझ दिली. सलमानच्या बर्थडे पार्टीत अनेक सेलेब्सही फार्महाऊसवर पोहोचले. बॉबी देओलही (Bobby Deol) येथे दिसला.

फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला देखील पार्टीला जाताना दिसली. कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबराही सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आला होता. सलमान खानचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. याच कारणामुळे त्याच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!