व्हिडिओ: सलमान खानने दाखवली जबरदस्त बॉडी; म्हणाला, ‘हा व्यक्ती टायगर ३…’


बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खानला तशी परिचयाची अजिबात गरज नाही. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. सलमान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो. सध्या तो आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. त्याने बऱ्याच दिवसांनी वर्कआऊट व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओही साधा-सुधा नाही, तर इतका इन्टेंस आहे की, त्याचा फिटनेस पाहणाऱ्याच्या भुवयाही उंचावल्याशिवाय राहणार नाहीत.

सलमानने आपला व्हिडिओ शेअर करत मजेशीर कॅप्शन दिले आहे, जे त्याच्या आगामी चित्रपटाकडे इशारा करत आहे. सलमान खानचा ‘टायगर ३’ या आगामी चित्रपटाची शूटिंग या महिन्यातच सुरू होणार आहे. तो त्याचीच तयार करत असल्याचे दिसत आहे. (Actor Salman Khan Shows His Workout Video Caption Reads This Guy Is Training For Tiger 3)

सलमान खानने दाखवली जबरदस्त बॉडी
सलमान खानचे चाहते त्याचा नुकताच शेअर केलेला व्हिडिओ पाहून खुश होऊ शकतात. त्याच्या ‘टायगर ३’ या चित्रपटात जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळेल. सलमान यासाठी खूपच घाम गाळताना दिसत आहे. यामध्ये नक्कीच शर्टलेस सीन असेल आणि चाहत्यांना त्याची जबरदस्त बॉडी पाहायला मिळेल. सलमानने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो वर्कआऊट करत आहे. यामध्ये तो आपली जबरदस्त बॉडी दाखवत आहे. सलमानने इंस्टाग्राामवर व्हिडिओ शेअर करत कॅप्शन दिले आहे की, “मला वाटते की, हा व्यक्ती टायगर ३साठी ट्रेनिंग करत आहे.”

शाहरुख, सलमानचे चाहते उत्साहित
व्हिडिओत सलमान खानचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. मात्र, त्याच्या झलक आणि बॉडीवरून समजते की, व्हिडिओत तोच आहे. माध्यमातील वृत्तानुसार, चित्रपटात सलमान खानसोबत इमरान हाश्मी आणि कॅटरिना कैफही आहेत. तसेच असेही वृत्त आहे की, शाहरुख खान चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे चाहते सलमान आणि शाहरुखला एकत्र पाहण्यासाठी खूपच उत्साहित आहेत.

याव्यतिरिक्त असेही म्हटले जात आहे की, शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटात सलमान खानही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे, वृत्तानुसार, सलमान खानने या चित्रपटाची शूटिंगही पूर्ण केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रिया वारियरचा देशात नाही तर परदेशात डंका! साडी नेसून रशियाच्या रस्त्यांवर केला भन्नाट डान्स

-‘सैंया झूठों का बड़ा सरताज निकला’ गाण्यावर थिरकली ऋचा चड्ढा; पब्लिक डिमांडवर शेअर केला व्हिडिओ

-पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच आकर्षक, पाहून चुकेल तुमच्याही हृदयाच्या ठोका


Leave A Reply

Your email address will not be published.