वडिलांनी समीराला विचारले, ‘केस कलर का नाही केले?’, अभिनेत्रीने दिले ‘हे’ शानदार उत्तर


अभिनेत्री समीरा रेड्डीने एक फोटो शेअर केला आहे आणि त्यासोबत जुन्या स्टिरियोटाईपला धक्का देणारी पोस्ट लिहिली आहे. या फोटोमध्ये समीराने तिचे केस कलर केले नाहीत आणि यासाठी एक खास कारणही दिले आहे. तिने सांगितले आहे की, जेव्हा ती हा फोटो शेअर करत होती, त्यावेळी तिच्या वडिलांना या पांढऱ्या केसांबद्दल अनेक शंका होत्या आणि लोक काय म्हणतील याची भीती होती. मात्र, समीराने तिची निवड महत्त्वाची ठरवली आणि ती तिच्या स्वातंत्र्याशी जोडून सादर केली. समीराच्या या पोस्टचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे.

समीरा रेड्डीने तिचा हा फोटो पोस्ट केला आणि लिहिले की, “माझ्या वडिलांनी विचारले की, मी माझे पांढरे केस का लपवत नाही? लोक काय विचार करतील याची त्यांना चिंता होती. मी उत्तर दिले की, जर त्यांनी विचार केला तर काय… याचा अर्थ मी वृद्ध आहे? आता सुंदर राहिली नाही. लोकांना मी आता सुंदर वाटत नाही? मी त्यांना सांगितले की, मी कशी होते, ते स्वातंत्र्य आहे. मी प्रत्येक २ आठवड्यांनी केसांना कलर करायचे. जेणेकरून कोणीही ते पांढरे केस ओळखू शकणार नाही. आता मला वाटेल, तेव्हा मी कलर करेल.”

“त्यांनी मला विचारले की, मी बोलताना विषय का बदलत आहे. मी म्हणाले की, का नाही. मला माहित आहे की, मी एकटी नाही. जुन्या विचारप्रक्रिया मोडल्या जातात, तेव्हाच बदल आणि स्वीकृती सुरू होते. जेव्हा आपण एकमेकांना जसे आहोत तसे राहून देतो, तेव्हा आत्मविश्वास स्वाभाविकरीत्या आपला मार्ग शोधू शकतो आणि मास्क किंवा कव्हरच्या मागे लपलेला नसतो. माझ्या वडिलांना समजले. वडील म्हणून मला त्यांची चिंता समजली. दररोज आपण शिकतो, पुढे जातो आणि आपल्याला छोट्या पायऱ्यांमध्ये शांतता मिळते. ही लहान पावले आहेत, जी आपल्याला मोठ्या ठिकाणी घेऊन जातात.”

समीरा रेड्डीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते देखील तिच्या या पोस्टचे भरभरून कौतुक करत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा भारताबद्दल परदेशी होस्टने ऐश्वर्याला विचारला ‘हा’ प्रश्न; अभिनेत्रीनेही दिले होते सडेतोड प्रत्युत्तर

-‘एकेकाळी टॅक्सीमध्ये बसणे अभिमानाची गोष्ट होती’, अनिल कपूर यांनी ‘त्या’ दिवसांची काढली आठवण

-तब्बल ३० वर्षानंतर अजय देवगणने रिक्रिएट केला त्याचा ‘सिग्नेचर स्टंट’; ट्रकवर केली जबरदस्त ऍक्शन


Leave A Reply

Your email address will not be published.