बॉलिवूड विश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी दोन नव्हे, तर तीनवेळा लग्न करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. ज्यात संजय दत्त, करण सिंग ग्रोव्हर यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. ज्यांची नावे वाचून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. वेगवेगळ्या कारणास्तव त्यांना दोन ते तीनवेळा लग्न करणे भाग पडले. चला तर मग त्या कलाकारांबद्दल जाणून घेऊया ज्यांनी अनेकवेळा लग्न केले आहे.
किशोर कुमार (Kishore Kumar)
किशोर कुमार यांनी दोन-तीन नव्हे, तर चारवेळा लग्न केले होते. किशोर कुमार यांचे पहिले लग्न १९५० मध्ये झाले होते. यानंतर त्यांनी १९६० मध्ये लग्न केले. तिसरा विवाह किशोर यांनी योगिता बालीसोबत केला होता, त्यांचे नाते फक्त २ वर्षे टिकले, त्यानंतर किशोर कुमार यांनी १९८० मध्ये चौथे लग्न केले.
निलिमा आझमी (Neelima Azmi)
शाहिद कपूर याला जन्म देणाऱ्या निलिमा आझमीचे पहिले लग्न पंकज कपूरसोबत झाले होते. यानंतर त्यांनी राजेश खट्टरसोबत दुसरे लग्न केले. राजेशनंतर निलिमा यांनी राजा अली खानशी लग्न केले, त्यांचे नाते केवळ पाच वर्षे टिकले.
विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra)
आमिर खान अभिनित ‘३ इडियट्स’ चित्रपटाचे निर्माते विधू विनोद चोप्रा यांनीही तीन लग्ने केली आहेत. विधूने १९९० मध्ये अनुपमा चोप्रासोबत तिसरे लग्न केले.
कमल हसन (Kamal Haasan)
कमल हसन यांचे नातेही काही खास राहिले नाही. कमल हसन यांनी पहिले लग्न गायिका वाणी गणपतीशी केले. यानंतर अभिनेत्याने सारिकाशी लग्न केले, ज्यापासून त्याला श्रुती हसन आणि अक्षरा हसन या दोन मुली झाल्या. सारिकापासून घटस्फोट घेतल्यानंतर कमल हसन गौतमीसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होते, पण नंतर दोघे वेगळे झाले.
संजय दत्त (Sanjay Dutt)
संजय दत्तने पहिले लग्न रिचा शर्माशी केले होते. १९९८ मध्ये संजयने रिया पिल्लई नावाच्या मॉडेलशी लग्न केले, त्यानंतर त्याने मान्यता दत्तशी लग्न केले.
विनोद मेहरा (Vinod Mehra)
विनोद मेहरा यांनीही तीन विवाह केले होते. विनोद मेहरा यांच्या तिसऱ्या पत्नीचे नाव किरण आहे.
कबीर बेदी (Kabir Bedi)
कबीर बेदी यांनी चार विवाह केले होते. कबीर यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी प्रवीण दुसांजसोबत चौथे लग्न केले होते.
करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover)
करण सिंग ग्रोव्हरच्या प्रेमप्रकरणाची बरीच चर्चा झाली आहे. करणने २००८ मध्ये श्रद्धा निगमसोबत पहिले लग्न केले. लग्नाच्या १० महिन्यांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. अभिनेत्याने पुन्हा जेनिफर विंगेटशी लग्न केले, त्यानंतर दोघांनी २०१४ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यानंतर करण सिंग ग्रोव्हरने बिपाशा बासूशी लग्न केले.
लकी अली (Lucky Ali)
गायक लकी अली यांनी देखील प्रथम परदेशी तरुणीशी लग्न केले. यानंतर लकी यांनी इनाया नावाच्या मुलीशी लग्न केले. सिंगरने २०१० मध्ये ब्रिटीश मॉडेलसोबत तिसरे लग्न केले.
अदनान सामी
अदनान सामीने चार विवाह केले. अदनानने एका मुलीशी दोनदा लग्न केले पण दोन्हीवेळा ब्रेकअप झाले. अदनानचे वैवाहिक जीवन जितके गुंतागुंतीचे होते तितके इतर कोणाचेही नसेल.
सिद्धार्थ रॉय कपूर (Siddharth Roy Kapoor)
सिद्धार्थ रॉय कपूर याने २०१२ मध्ये विद्या बालनसोबत लग्न केले. यापूर्वी यूटीव्हीच्या प्रमुखाने आपल्या बालपणीच्या मैत्रिणीशी लग्न केले होते. त्यानंतर २०११ मध्ये त्याचे एका टीव्ही प्रोड्युसरसोबत संबंध होते, मात्र वर्षभरानंतर त्याने विद्या बालनसोबत सात फेरे घेतले.
हेही वाचा-