Thursday, April 25, 2024

एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात अथांग बुडाले होते शाहिद अन् करीना, मात्र ‘या’ व्यक्तीमुळे गेले नात्याला तडे!

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांच्या अफेअरच्या चर्चा एकेकाळी चित्रपट जगतात रंगत असायच्या. शाहिद आणि करीना जवळपास ५ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. असे मानले जाते की, करीना आणि शाहिदचे नाते एखाद्या परीकथेपेक्षा कमी नव्हते, दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे होते. करीना देखील शाहिदवर खूप प्रेम करत होती, पण एक दिवस असाही आला जेव्हा दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

माध्यमांतील वृत्तानुसार, करीना आणि शाहिद यांच्यातील हे नाते अभिनेत्रीची आई बबिता कपूर (Babita Kapoor) आणि तिची बहीण करिश्मा कपूर (Karishma Kapoor) यांना अजिबात आवडत नव्हते. करीना कपूरने अनेकदा तिच्या निर्मात्यांना शाहिद कपूरला तिचा हिरो म्हणून ठेवण्यास सांगितले आणि हे अभिनेत्रीच्या आईला अजिबात आवडले नाही. २००४ मध्ये जेव्हा करीना आणि शाहिदचा ‘फिदा’ चित्रपट आला, त्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. असे मानले जाते की, जेव्हा शाहिदला ‘किस्मत कनेक्शन’ आणि करीनाला ‘टशन’मध्ये काम मिळाले तेव्हाच त्यांच्या आवडी बदलल्या.

‘टशन’ चित्रपटाच्या काळातच करीना कपूरला सैफ अली खान (Saif Ali Khan) आवडू लागला. त्याचवेळी शाहिद कपूरचे नावही विद्या बालनसोबत (Vidya Balan) जोडले जाऊ लागले. माध्यमांतील वृत्तानुसार, यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि त्यांच्यात सतत भांडण होऊ लागली. ज्यामध्ये अभिनेत्रीची आई बबिता कपूरनेही हस्तक्षेप केला. अखेर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

करीना कपूरने २००७ मध्ये सैफ अली खानला डेट करायला सुरुवात केली. पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर करीना आणि सैफने लग्न केले. २०१५ मध्ये शाहिद कपूरने मीरा राजपूतसोबत (Mira Rajput) लग्न केले. दोन्ही कलाकारांनी आता आपापल्या आयुष्यात प्रगती केली आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा