सिद्धार्थ आणि रणवीरची ‘८३’ प्रीमिअरवेळी ग्रेट भेट, दोन मित्रांमधील प्रेमाचा क्षण सोशल मीडियावर व्हायरल


अभिनेता सिद्धार्थ जाधव हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेला अभिनेता आहे. त्याने खास करून विनोदी पात्र निभावून प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. त्याच्या करिअरच्या गाडीने अशी काही धाव घेतली आहे की, त्याच्या कामाची चर्चा अगदी बॉलिवूडपर्यंत गेली आहे. त्याने बॉलिवूडमध्ये देखील काही चित्रपटात काम करून त्याच्या कामाची छाप पाडली आहे. त्याच्या या प्रवासातील बॉलिवूडमधील महत्वाचा चित्रपट म्हणजे ‘सिंबा’. या चित्रपटात सिद्धार्थने रणवीर सिंगसोबत काम केले आहे. या चित्रपटात त्याने पोलिसांची भूमिका निभावली होती. परंतु या पात्रात देखील त्याच्या विनोदी स्वभाव वृत्तीने त्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

अशातच ‘८३’ या चित्रपटाच्या प्रीमिअर रोजी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आले होते. यावेळी सिद्धार्थ (Siddharth Jadhav) आणि रणवीरची (Ranveer Singh) भेट झाली. या भेटीचा एक व्हिडिओ सिद्धार्थने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या दोघांमधील घट्ट मैत्री दिसत आहे. ते दोघे एकमेकांना मिठी मारत गप्पा मारताना दिसत आहेत. (siddharth jadhav share a video of 83 premier with ranveer singh)

हा व्हिडिओ शेअर करून सिद्धार्थने कॅप्शन दिले आहे की, “८३ प्रीमिअर, दादा के जलवे.” त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचे अनेक चाहते या पोस्टवर कमेंट करत आहेत. एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “मी मागे बोललो तेच म्हणेल. तू मराठीतला रणवीर सिंग नाही, तर रणवीर सिंग हिंदीतला सिद्धार्थ जाधव आहे. लव्ह यू दादा.” यासोबत या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

सिद्धार्थ जाधवने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. त्याने २००४ साली ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटात पहिल्यांदा काम केले होते. यानंतर त्याने ‘जत्रा’, ‘जबरदस्त’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘दे धक्का’, ‘गलगले निघाले’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘हुप्पा हुय्या’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘कुटुंब’, ‘फास्टर फेणे’, ‘जत्रा’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘दे धक्का’, ‘हुप्पा हुय्या’, ‘टाईम प्लीज’, ‘धुरळा’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!