आई-वडिलांच्या लग्नाआधी दोन वर्ष ‘तिचा’ झाला होता जन्म, पुढे बॉलीवूडसह साऊथ इंडस्ट्रीतही दिले हिट सिनेमे


आज साऊथ ते बॉलीवूड असा प्रवास करणाऱ्या अभिनेत्री श्रुती हसनचा वाढदिवस. तीचा जन्म २८ जानेवारी १९८६ ला चेन्नईमध्ये झाला. श्रुती प्रसिद्ध अभिनेता कमल हसन आणि अभिनेत्री सारिका ठाकूर यांची मोठी मुलगी आहे. चित्रपटाची पार्श्वभूमी लाभलेल्या श्रुतीने वयाच्या ४ थ्या वर्षीच बालकलाकार म्हणून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले.

श्रुती जरी हिंदी सिनेमांमध्ये पाहिजे तसे यश मिळवू शकली नसली तरी तिची साऊथ सिनेसृष्टीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणना होते. बॉलीवूडमध्ये तिचे करियर अपेक्षित असे झाले नसले तरी ती बॉलीवूड अभिनेत्री म्हणून सुद्धा ओळखली जाते. श्रुती तिच्या अभिनयाइतकीच वैयक्तिक आयुष्यातही अनेकदा चर्चेचा विषय ठरली. आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेया तिच्या आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टी.

श्रुती लहान असताना जेव्हा शाळेत जायची तेव्हा तिने तिचे नाव बदलले होते. कारण तिची अशी इच्छा होती की तिला कोणीही तिच्या नावावरून आणि ती एका सुपरस्टारची मुलगी आहे यावरून ओळखू नये. सामान्य मुलांप्रमाणेच तिला वागणूक मिळावी.

खूप कमी लोकांना माहित असेल की श्रुतीच्या जन्मानंतर दोन वर्षांनी तिच्या आई, वडिलांनी म्हणजेच कमल हसन आणि सारिका ठाकूर यांनी लग्न केले होते. कमल आणि सारिका लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. त्यातच सारिका गर्भवती राहिल्या आणि श्रुतीचा जन्म झाला. कमल यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला वाणी गनपथीला घटस्फोट देत सारिका यांच्याशी लग्न केले होते.

श्रुतीने चार वर्षांची असतानाच कमल हसन यांच्या ‘हे राम’ या सिनेमातून बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर २००९ साली आलेल्या ‘लक’ या हिंदी चित्रपटातून तीने पदार्पण केले. श्रुतीने हिंदीमध्ये अनेक सिनेमे केले, मात्र तिला अपेक्षित यश येथे मिळाले नाही, म्हणून तिने तिचा मोर्चा साऊथ इंडस्ट्रीकडे वळवला. साऊथमध्ये तिने अनेक हिट सिनेमे देत अभिनयसाठी पुरस्कारदेखील मिळवले आहेत.

श्रुती अभिनेत्रीसोबतच एक चांगली गायिका देखील आहे. तिने संगीत आणि गायनाचे शिक्षण कॅलिफोर्निया मधून घेतले आहे. कमल हसनच्या ‘चाची ४२०’ मध्ये तिने एक गाणे देखील गायले होते. शिवाय साऊथच्या फिल्मफेयर पुरस्कारांमध्ये ती पार्श्वगायनासाठी नामांकित देखील झाली आहे. तिने एक संगीतकार म्हणून देखील काम केले असून, २००९ मध्ये तिने ‘द एक्सट्रामेंटल्स’ नावाचा तिचा एक बँड बाजारात आणला आहे.

श्रुती हसन प्लस्टिक सर्जरी केल्यामुळे खूप ट्रोल झाली होती. स्वतः श्रुतीने सोशल मीडियावर जाहीर केले होते की तिने नाक आणि ओठ यांची सर्जरी करून त्यात बदल करून घेतला आहे. तेव्हा श्रुतीने सांगितले होते की, ” मी खूप आनंदी आहे. हो मी प्लस्टिक सर्जरी केली आहे आणि हे मान्य करायला मला कोणतीच लाज वाटत नाही. माझे जीवन आणि माझे आयुष्य असल्यामुळे मी मला हवे तसे नक्कीच करू शकते. ना मी नाही प्लस्टिक सर्जरीचा प्रसार करतेय आणि मी याच्या विरोधातही नाही. मात्र मी मला पाहिजे तसे केले.”
श्रुतीच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर श्रुती इटालियन अभिनेता माइकल कोर्सेल याला डेट करत होती. मात्र चार वर्षाच्या रिलेशनशिपनंतर २०१९ मध्ये त्यांचे नाते संपुष्टात आले. श्रुतीच्या या ब्रेकअपमुळे ती खूप निराश झाली होती, आणि त्यातच ती दारूच्या हरी गेल्याचे देखील बोलले जाते. मात्र यासर्वातुन ती खूपच लवकर बाहेर पडली. याआधी श्रुतीचे नाव क्रिकेटर सुरेश रैनासोबत देखील जोडले गेले होते.

श्रुतीने हिंदीमध्ये लकसिनेमासोबतच, दिल तोच बच्चा हैं जी, रामैय्या वस्तावैय्या, गब्बर इज बॅक, वेलकम बॅक, बहन होगी ‘तेरी आदी सिनेमांमध्ये काम केले असून साऊथमध्ये ती अनागनागा ओ धीरूडू, ७ ओम अरिवु, रेस गुर्रम, वारनम आयिरम, पृथ्वी, येननामो येधो आदी चित्रपटांमध्ये झळकली.

 


Leave A Reply

Your email address will not be published.