Friday, September 20, 2024
Home अन्य वैभव तत्त्ववादीने शेयर केली एक खास पोस्ट; सचिन सोबत काम करताना झाला इमोशनल…

वैभव तत्त्ववादीने शेयर केली एक खास पोस्ट; सचिन सोबत काम करताना झाला इमोशनल…

क्रिकेटचा महादेव मानल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचे सगळेचजन चाहते आहेत. सचिन आवडत नाही असा एकही भारतीय शोधून सापडणार नाही. प्रत्येक चाहत्याला आपण सचिनला एकदा तरी भेटावं असं वाटतं. अभिनेता वैभव तत्ववादी सुद्धा त्यातलाच एक. वैभव सचिनचा खूप मोठा चाहता आहे. वैभवचं हे स्वप्न मात्र आता पूर्णत्वाला आलंय. वैभव सचिनला भेटला असून फक्त भेटलाच नाही तर त्याच्यासोबत त्याने एका जाहिरातीत सुद्धा काम केलंय. आता वैभवने सोशल मिडीयावर त्याचा हाच कामाचा अनुभव शेयर केला आहे. 

वैभव आणि सचिन यांनी चितळे बंधूंच्या एका जाहिरातीत सोबत काम केलंय. सचिन सोबत काम करण्याचा हा अनुभव वैभवने शेयर केला. सोबत त्याने एक मोठी भावूक पोस्ट लिहिली आहे. वैभव लिहितो…    

या जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान, मी वातानुकूलित फ्लोअरवर असतानाही मी आतापर्यंत वापरलेला सर्वात जास्त मेकअप केला होता. माझा मेकअप आर्टिस्ट दर पाच मिनिटांनी सतत टच-अपसाठी येत होता. अखेरीस, मी निराश झालो आणि त्याला विचारले की मला घाम येत नसल्यामुळे तो वारंवार का येत आहेस ? त्याने सहज उत्तर दिले, “सर, तुम्ही रडत आहात.” त्या क्षणी, मला जाणवले की या अनुभवाचा माझ्यावर किती खोल परिणाम झाला. माझ्या बालपणीच्या आठवणी डोळ्यासमोर उलगडत होत्या आणि आताही हे लिहिताना माझे डोळे अश्रूंनी तरळले आहेत. सचिनच्या निवृत्तीनंतर क्रिकेट माझ्यासाठी पूर्वीसारखे राहिले नाही. नम्रतेच्या मूर्त स्वरूप असलेल्या या व्यक्तीला भेटणे आणि एकत्र काम करणे, याचा माझ्यावर कायमचा प्रभाव पडला आणि आता मला खूप बदल झाल्यासारखं वाटतंय. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासोबत काम करणे हे खरोखरच एक स्वप्न होते

वैभव तसा मराठीतला ओळखीचा चेहरा आहे. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये त्याने कामे केली आहे. त्याचप्रमाणे त्याने हिंदीत सुद्धा चांगली कामे केली आहे. नुकताच त्याचा अ वेडिंग स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित होऊन गेला. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

‘बाळासाहेबांनी मला घरी बोलावलं आणि’… अभिजित सावंतने सांगितला तो किस्सा

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा