‘हृदयसम्राट’ बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवासोबत पुन्हा स्पॉट झाली ‘ही’ अभिनेत्री, पाहा व्हायरल फोटो

Actress Alaya F Spotted With Rumoured Boyfriend Aishwary Thackeray And His Mother Smita


बॉलिवूड म्हटलं की चर्चा तर होणारंच. कलाकार मंडळी एकमेकांसोबत दिसल्यानंतर चर्चांना आपसुकच उधान येते. असेच काहीसे कमी वयात आपली ओळख निर्माण करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत घडले आहे. ती अभिनेत्री इतर कोणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बेदी यांची मुलगी अलाया एफ (फर्निचरवाला) आहे. ती ‘हृदयसम्राट’ आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवासोबत पुन्हा एकदा स्पॉट झाली आहे. यादरम्यानचे त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.

नुकतेच मुंबईमध्ये अलाया आपल्या कथित बॉयफ्रेंड ऐश्वर्य ठाकरे आणि त्याची आई स्मिता ठाकरेसोबत हँगआऊट करताना दिसली. अलायाने यावेळी काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. यासोबतच पांढऱ्या रंगाचा बूट घातल्यामुळे ती आणखीच हटके दिसत होती. दुसरीकडे ऐश्वर्यने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता आणि गळ्यात लाल रंगाचा रुमाल बांधला होता.

याव्यतिरिक्त स्मिता ठाकरे या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये होत्या. मागील काही दिवसांपासून ऐश्वर्य आणि अलाया यांच्या डेटिंगबद्दलचे वृत्त माध्यमांमध्ये आहे. ऐश्वर्यला अलायाच्या वाढदिवस पार्टीमध्येही स्पॉट करण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचेही फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत. नुकतेच अलायाने आपल्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला होता.

ऐश्वर्यसोबतच्या नात्याबद्दल विचारले असता, अलायाने माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, “तो माझा खूप चांगला मित्र आहे. मला माहिती आहे की, असे म्हणणे अतिशयोक्ती होईल. परंतु आमच्या कुटुंबातही खूप चांगली मैत्री आहे. माझी आई आणि त्याच्या आईला ओळखते. माझे आजोबा ऐश्वर्यच्या आईला ओळखतात. आमचे कुटुंब खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखते. केवळ मीडियाची नजर आमच्यावर गेली आहे. त्यामुळे त्यांना वाटत आहे की, आमच्यामध्ये काहीतरी सुरू आहे. जर ते पहिल्यापासूनच आम्हाला फॉलो केले असते, तर त्यांना आमचे अनेक फोटो मिळाले असते.”

अलाया सोशल मीडियावर जबरदस्त सक्रिय असते. ती अनेक फोटो आणि व्हिडिओही चाहत्यांसाठी शेअर करताना दिसते. त्याचसोबत ती ऐश्वर्यबरोबर डान्स प्रशिक्षण घेताना दिसली होती.

खरं तर दोघेही एकाच ठिकाणी डान्स शिकण्यासाठी जातात. यामुळे दोघेही एकत्र सराव करतात.

अलायाने सन २०२० मध्ये आलेल्या ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. यामध्ये तिच्यासोबत नवाब सैफ अली खान मुख्य भूमिकेत होता. ती लवकरच अनेक चित्रपटामध्ये दिसू शकते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आहा! बॉलिवूड कपल रणबीर- आलिया करणार होते सर्वांसमोर ‘लिप- लॉक’, पाहा त्यांचा रोमँटिक व्हिडिओ

-बॉलिवूड अभिनेत्री उर्वशीने कापले १० किलो कांदे, चारच तासात व्हिडिओला मिळाले १९ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

-अबब! उर्वशी रौतेलाचा ५० लाखांचा बोल्ड अँड ब्युटीफुल लुक, पाहा या लूकचे दोन खास व्हिडीओ


Leave A Reply

Your email address will not be published.