अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने अलिकडेच बॉयफ्रेंड विकी जैनसोबत (Vicky Jain) लग्नगाठ बांधली. अंकिता लग्नानंतरचा तिचा वाढदिवस साजरा करत आहे. लोखंडेपासून मिसेस जैन बनलेली अंकिता रविवारी (१९ डिसेंबर) तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. लग्नानंतरचा हा तिचा पहिला वाढदिवस असल्याने, ती तिच्या सासरच्या घरी वाढदिवस साजरा करत आहे. मध्यरात्री अंकिताने पती विकी, कुटुंब आणि मित्रांसोबत उत्साहात साजरा केला आणि आयुष्याच्या नवीन वर्षाचे स्वागत केले. विकीनेही अंकितासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कुटुंब आणि मित्रांसह वाढदिवस केला साजरा
अंकिता आणि विकी हे १४ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटल्यानंतर विकीला त्याची पत्नी अंकिताचा हा खास दिवस आणखी खास बनवायचा आहे. म्हणूनच त्याने मध्यरात्री सोशल मीडियावर केवळ एक खास पोस्टच शेअर केली नाही, तर कुटुंब आणि मित्रांसोबत जोरदार सेलिब्रेशनही केले. (
मध्यरात्री कापला केक
अंकिताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर सेलिब्रेशनच्या काही झलक शेअर केली आहेत. जी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. अंकिता ट्रॅकसूटमध्ये केक कापताना दिसत आहे. त्यातील एका केकवर ‘मिसेस जैन’ असे लिहिले आहे. विकी अंकितासाठी हॅप्पी बर्थडे गाणेही गाताना दिसत आहे.

कुटुंबही सेलिब्रेशनमध्ये झाले सामील
अंकिताच्या वाढदिवसाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सेलिब्रेशनमध्ये अंकिताची आई आणि बहिणीसोबत तिची मैत्रिण आणि अभिनेत्री आशिता धवनही दिसत आहे.
विकी जैनने केली विशेष पोस्ट
विकीने अंकितासोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. त्याने स्वतःचा आणि अंकिताचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये सूर्यास्त दिसत आहे. फोटोत दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले दिसत आहेत. हा फोटो शेअर करत विकीने कॅप्शन लिहिले आहे की, “हॅप्पी बर्थडे मिसेस जैन.”
अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) देखील अंकिता आणि विकीच्या लग्नाच्या संगीतात सामील झाली होती. कंगना आणि अंकिताचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. दोघींनी ‘मणिकर्णिका’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अंकिता काही काळापूर्वी ‘पवित्र रिश्ता २’मध्ये दिसली होती. या शोचे टेलिकास्ट ओटीटी प्लॅटफॉर्मवर करण्यात आले. या शोमध्ये अंकितासोबत शाहीर शेख मुख्य भूमिकेत दिसला होता आणि दोघांची केमिस्ट्री चांगलीच आवडली होती.
हेही वाचा-