लय भारी! अंकिताने पती विकीसोबत दिली जबरदस्त पोझ, मराठमोळ्या लूकने जिंकली चाहत्यांची मने


अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघांचे लग्न मोठ्या थाटात पार पडले. दोघांच्या फोटोंना सोशल मीडियावर खूप पसंती मिळाली. अंकिताचे लग्नानंतरचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. विकीच्या कुटुंबाने त्यांची नवीन सून अंकिताचे संपूर्ण मराठी पद्धतीने कुटुंबात स्वागत केले. लग्नानंतर ‘पवित्र रिश्ता’ फेम अंकिता मराठमोळ्या लूकमध्ये अतिशय क्यूट दिसत आहे.

अंकिता लोखंडे दिसली पारंपारिक मराठी लूकमध्ये
अंकिताने (Ankita Lokhande) तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर विकी (Vicky Jain) आणि त्याच्या कुटुंबासोबतचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अंकिता आणि विकी पारंपारिक लूकमध्ये दिसत आहेत. अंकिताने लाल बॉर्डर असलेली पिवळी साडी नेसली होती. तसेच नाकात नथ, गळ्यात आणि कानात जड दागिने घातलेले दिसले, तर विकीही आपल्या वधूशी मॅचिंग कुर्ता पायजमामध्ये दिसला. दोघेही खूप सुंदर दिसत होते.

अंकिता पतीकडे दिसली प्रेमाने पाहताना
फोटोंमध्ये अंकिता पती विकीकडे प्रेमाने पाहताना दिसत आहे, तर काही फोटोंमध्ये ती विकीच्या बोलण्यावर प्रेमाने हसताना दिसत आहे. अंकिता आणि विकी एकमेकांसोबत जोरदार पोझ देताना दिसत आहेत. विकी देखील अंकिताकडे प्रेमाने हसताना पाहत आहे.

सासू आणि कुटुंबासह फोटो केले शेअर
अंकिताने विकी व्यतिरिक्त तिच्या सासू आणि विकीच्या संपूर्ण कुटुंबासह फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये अंकिता तिच्या सासू-सासऱ्यासोबत पोझ देत आहे, तर या फोटोत तिने सासू- सासरे आणि आजीबरोबर खूप प्रेमाने वेगवेगळ्या पोझ दिल्या. अंकिता तिच्या नवीन कुटुंबासह आणि सर्व विधी करताना खूप आनंदी दिसत आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांना आवडले फोटो
अंकिताने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. तिच्या फोटोंना आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अंकिता आणि विकीच्या या फोटोंनी चाहत्यांना अर्चना आणि मानव यांची आठवण करून दिली.

१४ डिसेंबर रोजी झाले लग्न
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचे लग्न १४ डिसेंबर रोजी मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये झाले. त्यांच्या लग्नाला अनेक टेलिव्हिजन अभिनेत्री आणि त्यांचे मित्र उपस्थित होते. दोघांनीही शाही पद्धतीने लग्न केले. वधू बनलेली अंकिता सोनेरी रंगाच्या लेहंग्यात खूपच सुंदर दिसत होती. हळदीपासून लग्न आणि मेहंदीपर्यंतचे त्यांचे फोटो खूप व्हायरल झाले होते.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!