दाक्षिणात्य स्टायलिश अभिनेत्रीने पारंपारिक लूकमधील फोटो केले शेअर; पाहून चाहतेही झाले घायाळ


अप्रतिम ड्रेसचे कलेक्शन ठेवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अनु इमॅन्युएलचाही समावेश आहे. ती आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून नेहमीच आपल्या स्टायलिश अंदाजातील फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंंटवर पारंपारिक लूक शेअर केला. यामध्ये ती निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तसं पाहिलं तर अनु अधिकतर पाश्चिमात्य लूकमध्ये पाहायला मिळते. परंतु तिच्या चाहत्यांना तिचा साडीतील लूकही चांगलाच भावला आहे. हे फोटो पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.

निळ्या रंगाची साडी आणि स्लीव्हलेस ब्लाऊजमध्ये अनु एकदम सुंदर दिसत आहे. सिल्व्हर रंगाचे कानातले तिच्या सुंदरतेमध्ये मोलाची भर घालत आहेत.

विशेष म्हणजे अनुची ही साडी सेल्फ डिझाइन केलेली आहे. तिचे मोकळे केस, लिपस्टिक आणि आयलायनरचा वापर करून अनु हलक्या मेकअपमध्येही उठून दिसत आहे.

चाहते अनुच्या या पारंपारिक लूकव्यतिरिक्त तिच्या हावभावांचीही प्रशंसा करत आहेत. अनु लेटेस्ट फोटोशूटमध्ये कमालीची दिसत आहे, यात शंकाच नाही.

अनुचा जन्म युएसएच्या शिकागोमध्ये झाला होता. परंतु ती मूळ भारतीय आहे. अनुचे पालन- पोषण आणि शिक्षणदेखील अमेरिकेतच झाले आहे. तरीही तिला जी ओळख मिळाली, ती भारतातच मिळाली आहे.

तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती लवकरच महा समुद्रममध्ये दिसणार आहे. अनु दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तमिळ आणि तेलुगु चित्रपटांमध्येही काम केले आहे.

अभिनेत्री अनु आपल्या कारकीर्दीची सुरुवात ‘स्वप्ना संचारी’ या चित्रपटामध्ये बाल कलाकार म्हणून केली होती. तिने या चित्रपटात जयारामच्या मुलीचा मुलीची भूमिका साकारली होती.

‘स्वप्ना संचारी’ चित्रपटाच्या ५ वर्षांच्या ब्रेकनंतर अनुने पुनरागमन केले. यानंतर ती ‘ऍक्शन हीरो’ चित्रपटात नवीन प्यूलसोबत रोमँटिक अंदाजात दिसली होती. तिने दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन, नागा चैतन्य यांसारख्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-शूटिंगदरम्यान राजीव कपूर पडले होते पद्मिनी कोल्हापुरेच्या प्रेमात; राज कपूर यांनी धमकी दिल्यावर तुटले होते दोघांचे नाते
-‘भाऊ, तेवढंच काम राहिलंय आता…’, सोनू सूदकडे चाहत्याने केली अशी तक्रार की अभिनेत्याने तिथेच जोडले हात
द लेजेंड हनुमान  सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित, जाणून घ्या कोणता रोल निभावतो मराठमोळा शरद केळकर?
तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरतंय स्पेलंडर  गाणं, रिलीज झाल्यापासून चार दिवसांत मिळालेत लाखो हिट्स
गुरु रंधावाच्या या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; हिट्स लाखोंच्या घरात


Leave A Reply

Your email address will not be published.