प्रीमिअर ‘८३’ सिनेमाचे, पण वाहवा लुटली दीपिकाच्या ‘त्या’ ड्रेसमधील सौंदर्याने, फोटो भन्नाट व्हायरल


सुपरस्टार रणवीर सिंग आणि त्याची पत्नी तसेच अभिनेत्री दीपिका पदुकोणचा बहुप्रतिक्षित ‘८३‘ सिनेमा शुक्रवारी (२४ डिसेंबर) प्रदर्शित होत आहे. यापूर्वी निर्मात्यांनी मुंबईत चित्रपटाचा प्रीमिअर केला. यामध्ये चित्रपटाच्या कास्टसोबतच बॉलिवूड कलाकारांनीही हजेरी लावली होती. या प्रीमिअरदरम्यान दीपिकाच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, तर रणवीरही चांगलाच स्टाईलमध्ये दिसत होता. मात्र, प्रीमिअरनंतर दीपिकाने आपला गाऊन बदलून कॅज्युअल ड्रेस धारण केला.

दीपिका पदुकोण (Deepika Padukone) चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान प्लंजिंग नेकलाईनचा स्लीव्हलेस काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. हा गाऊन दीपिकाला शोभत होता. तिने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी डायमंड ऍक्सेसरीज आणि हलके दागिने कॅरी केले होते. तसेच तिने जबरदस्त नेकपीसही घातला होता.

दीपिकाने आपल्या केसांना कर्ली केले होते. तिचा हा लूक विंटेज वाटत होता. तसेच ती आपल्या सौंदर्याने उपस्थितांना आकर्षित करण्यातही यशस्वी झाली. मात्र, यानंतर अभिनेत्रीने तिचा ड्रेस बदलला होता. दीपिका प्रीमिअर संपताच कॅज्युअल आऊटफिटमध्ये दिसली. ती काळ्या रंगाची शिमरी आणि निळ्या रंगाची डेनिममध्ये स्पॉट झाली.

असे म्हटले जात आहे की, दीपिका पदुकोण काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये स्वस्थ नव्हती, त्यामुळे तिने तो ड्रेस बदलला होता. तरीही, कॅज्युअल ड्रेसमध्येही दीपिका कमालीची सुंदर दिसत होती. तिच्या सौंदर्याने लाखो चाहत्यांचे मन जिंकले आहे.

गुरुवारी (२४ डिसेंबर) हा चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहत्यांसोबतच अनेक कलाकारही वाट पाहत आहेत.

दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती शेवटची २०२० साली प्रदर्शित झालेल्या ‘छपाक’ या चित्रपटात झळकली होती. आता ती ‘८३’नंतर ‘फायटर’, ‘द इंटर्न’, ‘प्रभास- नाग अश्विन’ आणि ‘पठाण’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!