अभिनेत्री गहना वशिष्ठने शेअर केला बोल्ड फोटो; कॅप्शनमध्ये म्हणतेय, ‘मी पूर्ण कपड्यांमध्ये…’


‘कुछ लोगों का नाम उनके काम से होता हैं, कुछ लोगो का नाम बदनाम हो के’ हा एका प्रसिद्ध चित्रपटातील प्रसिद्ध संवाद आहे. हा संवाद एका अभिनेत्रीला तंतोतंत जुळताना दिसतो. ती अभिनेत्री म्हणजे गहना वशिष्ठ. प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल असणारी गहना मागील काही महिन्यांपासून चांगलीच चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असणारी ही बोल्ड अभिनेत्री तिच्या पोलीस केसमुळे प्रकाशझोतात आली आहे.

गंदी बात फेम गहनाने नुकताच तिचा एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती बेडरूममध्ये बेडवर बसलेली दिसत असून, तिने गोल्डन रंगाचे वर्क असलेला एक काळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. मात्र या फोटोत तिने पॅन्ट किंवा लेगिन्स घातली नाहीये. हा फोटो पोस्ट करताना तिने लिहिले, किंबहुना तिने नेटकऱ्यांना एक प्रश्नच विचारला आहे, “मी पूर्ण ड्रेसमध्ये देखील चांगली दिसते ना?” तिचा हा फोटो आता चांगलाच व्हायरल झाला आहे. तसेच या फोटोवर यूजर्सच्या भरपूर कमेंट्स आणि लाइक्स येत आहे.

काही महिन्यांपूर्वी तिला पॉर्न फिल्म शूट केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. ५ महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर गहना वशिष्ठला जामिन मिळाला आणि ती बाहेर आली. तिच्यावर ८५ पॉर्न सिनेमे शूट केल्याचा आरोप आहे. मुंबईमध्ये अभिनयात करियरसाठी येणाऱ्या लोकांना पैशाचे आमिष दाखवून, त्यांच्याकडून ती हे कमी करून घ्यायची.

गेहनाने कॉम्प्यूटर सायन्समध्ये बीटेक केले आहे. भोपाळमधील महाविद्यालयातून तिने अभियांत्रिकीची पदवी घेतली. महाविद्यालयीन कालपासूनच तिला मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या. म्हणून तिने पूर्णवेळ मॉडेलिंगला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २०१२ मध्ये, गहनाने मिस आशिया बिकिनी ब्यूटी पेजेंटही जिंकले. तिने जवळपास ८० हून जास्त ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे. तिने मॉन्टे कार्लो, फिलिप्स अरेना, शवर्ले क्रूझ कार यांसारख्या मोठ्या ब्रँडच्या जाहीरातींमध्ये काम केले आहे.

‘दाल में कुछ काला है’, ‘लखनवी इश्क’ आणि ‘उन्माद’ यांसारख्या काही शॉर्ट फिल्ममध्येही तिने काम केले. गहनाने अनेक तेलगू सिनेमांमध्येही काम केले आहे. मात्र तिला एकता कपूरच्या ‘गंदी बात’ या अडल्ट सिरीजने तुफान लोकप्रियता मिळवून दिली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ‘डिज्नी प्रिंसेस’ दिसतेय रुबीना दिलैक; पाहा अभिनेत्रीच्या मनमोहक अदा

-‘सच कहूं तो’मध्ये नीना गुप्ता यांनी केला त्यांच्या पहिल्या लग्नाबाबत खुलासा; म्हणाल्या, ‘तो अनुभव खूपच…’

-खरी-खुऱ्या आयुष्यातली ‘बार्बीडॉल’ आहे कॅटरिना कैफ; वाचा तिच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी


Leave A Reply

Your email address will not be published.