जेव्हा बहीण सोनमच्या लग्नात नटून- थटून पोहोचली होती जान्हवी कपूर; पाहून लोकांना झाली श्रीदेवीची आठवण


कोणत्याही मुलीच्या लग्नात नवरीमुलीपेक्षा तिच्या बहिणी आणि मैत्रिणीच तयार होत असतात. हे अगदी बॉलिवूडमध्येही सर्रास आपल्याला पाहायला मिळत होते. असेच काहीसे झाले होते अभिनेत्री आणि सुपरस्टार अनिल कपूरची मुलगी असलेल्या सोनम कपूरच्या लग्नात. सोनम आणि आनंद आहुजाचे लग्न एकदम धुमधडाक्यात झाले होते. बहीण सोनमच्या लग्नाच्या या खासप्रसंगी जान्हवी कपूरनेही नटून- थटून जोरदार तयारी केली होती.

सोनमच्या लग्नात जान्हवीने बॉलिवूडचा प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राकडून आपला लेहंगा बनवला होता. सन २०१८ मध्ये झालेल्या सोनम- आनंदच्या लग्नात जेव्हा जान्हवी गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान करून पोहोचली, तेव्हा तिला पाहून उपस्थितांना तिची आई आणि दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीची आठवण आली. (Actress Janhvi Kapoor Looks Gorgeous In Manish Malhotra Pink Lehenga In Sonam Kapoor Wedding)

कॉटन सिल्क ऑर्गेन्झा आणि टिशू फॅब्रिकने बनलेल्या लेहंग्यावर गुलाबी आणि आकाशी निळ्या तसेच हिरव्या रंगाची एम्ब्रॉयडरी होती. हा लेहंगा परिधान करून जान्हवी खूपच सुंदर दिसत होती. थ्री पीस सेटमध्ये लेहंगा चोली आणि ओढणी होती. लेहंग्याचा रंग संयोजन म्हणजेच कलर कॉम्बिनेशन सर्वात हटके होते. या लेहंग्यासोबतच चोकर हेवी नेकलेस आणि माथ्यावर मांगटिका तिच्या सौंदर्यात चार चाँद लावत होता.

Photo Courtesy: Instagram/janhvikapoor

जान्हवी मॉडर्न असो किंवा ट्रॅडिशनल प्रत्येक ड्रेसमध्ये सुंदर दिसते. तिची स्टाईलही मुली नेहमीच कॉपी करताना दिसतात. सोनमच्या लग्नात तिची उत्तम निवड होतीच, तसेच मनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या या लेहंग्यात तिने सुंदर पोझही दिल्या आहेत. या फोटोत ओढणी घेऊन जान्हवी एकदम नवरीप्रमाणे तयार झालेली दिसत आहे. फिक्कट हिरवा आणि सोनेरी रंगाच्या या लेहंग्यासोबतच तिने हेवी मॅचिंग ज्वेलरी परिधान केली आहे. मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला हा लेहंगा कोणत्याही नवरी मुलीसाठी एकदम परफेक्ट आहे.

जान्हवी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. याव्यतिरिक्त तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती लवकरच ‘गुड लक जेरी’मध्ये झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बकेट लिस्ट’ फेम रितिका श्रोत्रीच्या लेटेस्ट फोटोची इंटरनेटवर धूम; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

-पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचच्या हाती आणखी एक यश; राज कुंद्रानंतर ‘या’ व्यक्तीला ठोकण्यात आल्या बेड्या

-वैदेही परशुरामी विचारतेय, ‘कॉफी घेणार का?’; व्हायरल होतेय लेटेस्ट पोस्ट


Leave A Reply

Your email address will not be published.