‘बेबो’ करीना कपूरने दाखवली आपल्या तिसऱ्या मुलाची झलक; पाहून तुम्हीही व्हाल हैराण


बॉलिवूडची ‘बेबो’ म्हणजेच करीना कपूर खानच्या घरी आनंदाचे वारे वाहत आहेत. ती दोन मुलांची आई झाली आहे. मात्र, अशातच आता तिने आपल्या तिसऱ्या मुलाचा उल्लेख करत सर्वांनाच चकित केले आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये करीनाची गणना होते. ती नेहमीच आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. २१ फेब्रुवारी रोजी दुसऱ्यांदा आई बनल्यानंतर आता तिने  आपल्या तिसऱ्या मुलाचे नाव जाहीर करत त्याची झलकही दाखवली आहे.

खरं तर, करीनाने आपल्या एका पुस्तकाची घोषणा केली आहे. या पुस्तकात तिने आपल्या प्रेग्नंसीचे अनुभव शेअर केले आहेत. विशेष म्हणजे करीनाने या पुस्तकालाच आपले तिसरे अपत्य म्हटले आहे. तसेच याचे नाव ‘बायबल’ असे ठेवले आहे. (Actress Kareena Kapoor Khan Announces Book Pregnancy Bible Shares Pic of Her Third Child)

करीनाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती किचनमध्ये उभी आहे. तसेच ती बेकिंग ट्रेमधून आपले प्रेग्नंसी पुस्तक काढते. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले आहे की, “हा माझा प्रवास आहे. माझ्या दोन्ही प्रेग्नंसी आणि माझे प्रेग्नंसी पुस्तक बायबल. काही दिवस चांगले होते, तर काही वाईट. काही दिवस मी कामावर जाण्यासाठी उतावळी होते, तर काही दिवस बेडवरून उठणेही कठीण व्हायचे. हे पुस्तक माझ्या हृदयाच्या खूपच जवळ आहे. कारण यामध्ये मी माझ्या दोन्ही प्रेग्नंसीदरम्यान शारीरिक आणि भावनिक अनुभवाबद्दल लिहिले आहे.”

करीनाने आपले वैयक्तिक अनुभव शेअर करण्यासोबतच व्यावसायिक डॉक्टर आणि तज्ञांचे मत तसेच त्यांची मान्यताही यामध्ये सामील केली आहे. यामधून इतर प्रेग्नंट महिलांनाही तिच्या अनुभवातून फायदा मिळेल.

“याला देशातील स्त्री रोग आणि प्रसूती रोग तज्ञांची गव्हर्निंग बॉडी FOGSIची मान्यता देण्यात आली आहे. सोबतच हे लिहिण्यात माझ्या वैयक्तिक डॉक्टरांचेही भरपूर योगदान आहे. मी हे पुस्तक तुमच्यासोबत शेअर करून खूपच उत्साही आणि नाराज दोन्हीही आहे. पुस्तक लवकरात लवकर ऑर्डर करा.”

करीनाच्या या पोस्टला ३ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. दुसरीकडे १ हजारांपेक्षाही अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.

तिच्या आगामी कामकाजाबद्दल बोलायचं झालं, तर ती लवकरच आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये झळकणार आहे. याव्यतिरिक्त तिच्याकडे करण जोहरचा ‘तख्त’ चित्रपटही आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाचे नाव झाले फायनल; आजोबा रणधीर कपूर यांनी दिली माहिती

-जोहरा सेहगल यांना बिग बी म्हणाले होते, ‘१०० वर्षांची मुलगी’; तर मजेदार होती त्यांची शेवटची ईच्छा

-संस्कृती बालगुडेने घोड्यासोबत केलं फोटोशूट; हटके फोटोंना मिळतोय चाहत्यांचा प्रतिसाद


Leave A Reply

Your email address will not be published.