लग्न होताच कॅटरिना कैफने दिला सलमान खानला डच्चू! जाणून चाहतेही होतील थक्क


बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांचा विवाह ९ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये झाला होता. लग्नानंतर हे दोन्ही कलाकार अवघ्या काही दिवसांसाठी हनीमूनसाठी मालदीवला गेले होते. यानंतर दोघेही मुंबईत परत आले. त्यामुळे या दोन्ही कलाकारांची कामाची बांधिलकी तिथेच होती. त्यावेळी बातम्या आल्या होत्या की, कॅटरिनाला लग्नानंतर लवकरच सलमान खानच्या (Salman Khan) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टायगर ३’ची शूटिंग करणार आहे. पण आता समोर आलेली बातमी जाणून घेतल्यानंतर तुम्हीही म्हणाल की, कॅटरिनाने लग्नानंतर सलमानची फसवणूक केली आहे.

कॅटरिनाने फसवले सलमान खानला
लग्नाच्या काही दिवसांनंतर नवी नवरी कॅटरिना पती विकीसोबत जास्त वेळ घालवू शकली नाही. त्याचे कारण सांगितले जात आहे की, ती ‘टायगर ३’चे शूटिंग करत होती. त्यावेळी अशा बातम्या आल्या होत्या की, अभिनेत्रीने लग्नामुळे काही दिवस शूटिंगमधून ब्रेक घेतला आहे आणि लग्नानंतर लवकरच ती ‘टायगर ३’चे शूटिंग करणार आहे. पण आता कॅटरिना ‘टायगर ३’साठी नव्हे, तर इतर कोणत्यातरी चित्रपटासाठी शूट करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. म्हणजेच ‘टायगर ३’ चित्रपटाच्या शूटिंगची तारीख बदलण्यात आली आहे.

‘मेरी ख्रिसमस’चे आधी करणार शूट
माध्यमांतील वृत्तानुसार, लग्नानंतर कॅटरिना ‘टायगर ३’ ऐवजी ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. श्रीराम राघवन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. कॅटरिना या आठवड्यात या चित्रपटाचे शूटिंग सुरू करू शकते. मुंबईतील एका स्टुडिओमध्ये हे शूटिंग होणार आहे.

विकी कौशल आहे ‘सॅम बहादूर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त
माध्यमांतील वृत्तानुसार, विकी कौशल लग्नानंतर मेघना गुलजारच्या ‘सॅम बहादूर’ या चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. विकीशिवाय या चित्रपटात फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा ​​दिसणार आहेत.

कॅटरिनाचे आगामी चित्रपट
कॅटरिनाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ‘टायगर ३’ आणि ‘मेरी ख्रिसमस’ व्यतिरिक्त, ‘फोन भूत’ चित्रपट आणि ‘सुपरवुमन’ चित्रपट देखील त्यात सामील आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!