Thursday, July 18, 2024

अर्रर्र! किरणने ‘अनारकली’पासून ‘मुजरा’पर्यंत संबाेधले करणला, पाहा व्हायरल व्हिडिओ

यावेळी बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिवाळी उत्साहात साजरी केली. अमिताभ बच्चन यांच्या दिवाळी पार्टीत स्टार्सची गर्दी होती. दिवाळी साजरी करण्यासाठी सर्वजण एकापेक्षा एक स्टायलिश ड्रेस घालून आले होते. करण जोहर हा देखील त्याच्या शानदार स्टाईलमध्ये पोहोचला आणि किरण खेर हिला सुंदर लाल सलवार सूटमध्ये पाहून टोमणा मारला, तर किरण हिने ही करणची त्याच्या कपड्यांपासून त्याच्या चालण्याच्या शैलीपर्यंत खुलेपणाने खिल्ली उडवली.

विशेष म्हणजे किरण खेर (kirron kher) सोबतचा हा व्हिडिओ करण जोहर (karan johar) याने स्वतः त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. दिवाळीच्या दिवशी अमिताभ बच्चन यांनी प्रतीक्षा इथे एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन केले होते. तिथे करण जोहर आणि किरण खेर यांची भेट झाली. दोघांनी एकत्र टीव्ही रिऍलिटी शोजही जज केले आहेत. किरण तिच्या फनी स्टाइलसाठी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे, तर करण फनी व्हिडिओंसाठी प्रसिद्ध आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

करणने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये किरणला लाल रंगाच्या ड्रेसमध्ये पाहून करण म्हणाला, “आपल्याला करवा चौथला उशीर नाही झाला का, हे ऐकून काहीतरी खाताना किरणचा हात थांबला आणि म्हणाली, तू गप्प बस.. तू जे हे अनारकली बनून आला आहे ना, थोड्याच वेळात मुजरा आत हाेईल.. यानंतर किरण त्याच्या चालण्याच्या स्टाईलची नक्कल करत म्हणाली, जितकी सुंदरता तुझ्यात आहे, तितकी इथल्या कोणत्याही स्त्रीमध्ये नाही.” करणला किरणच्या बाेलण्याचे अजिबात वाईट वाटले नाही आणि या मजेदार व्हिडिओला शेअर करत करणने कॅप्शनमध्ये लिहिले,”ओजी टूडल्स, किरण खेर इज बॅक.”

करणच्या या मजेशीर व्हिडिओवर चाहत्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटीपर्यंत सर्व हसत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या दिवाळी पार्टीला अनुपम खेरस, सिकंदर खेरस, शाहरुख खान, गौरी खान देखील उपस्थित होते. किरणने तिच्या इंस्टाग्रामवर पार्टीत क्लिक केलेले अमिताभ, अभिषेक आणि सिकंदर यांचा फोटो शेअर केला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बाबाे! काजोलची लाडकी न्यासाचा नवा लूक पाहून चाहते झाले आश्चर्यचकित केली जान्हवीशी तुलना

जरा इकडे पाहा! कॅटरिनाला साऊथ चित्रपटात करायचे आहे काम; म्हणाली, ‘भाषा माझ्यासाठी अडथळा’

हे देखील वाचा