विकी आणि कॅटरिनाच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल, कॅटरिनाने सासऱ्यांसोबत केला भन्नाट डान्स


बॉलिवूड अभिनेता विकी कौशल ( Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नानंतर दोघांचेही फोटो समोर येत आहेत. हे जोडपे त्यांच्या लग्नाच्या विधींचे फोटो सतत शेअर करत आहे. दोन्ही कलाकार इंडस्ट्रीतील मित्रांच्या घरी त्यांच्या लग्नाची मिठाई पाठवत असताना, ते स्वतःच चाहत्यांना त्यांच्या लग्नाची सुंदर झलक दाखवत आहेत. शनिवारी (११ तारखेला) हळदी सोहळ्याचे फोटो शेअर केल्यानंतर आता कॅटरिना आणि विकीने त्यांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.

कॅटरिना आणि विकी यांनी त्यांच्या मेहंदी सोहळ्यात धमाल केल्याचे या फोटोंवरून दिसत आहे. फोटोंमध्ये दोघेही जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. विकी आणि कॅटरिनाने या फोटोंना कॅप्शन दिले आहे, ज्यात लिहिले आहे की, “भागदा तो सजदा नाचे सारा तुबार!”

कॅटरिनाने देखील तिचे सासरे शाम कौशल यांच्यासोबत ढोलच्या तालावर जोरदार ताल धरलेला दिसून येत आहे. दोघांची मजा आणि चेहऱ्यावरचा आनंद या फोटोत स्पष्टपणे पाहायला मिळतो. कॅटरिनाचे हात मेहंदीने सजलेले दिसत असून, कॅटरिना तिच्या बहिणी सोनिया आणि इसाबेलसोबत दिसत आहे. कॅटरिनाच्या लग्नात तिचा दिर सनी कौशलसोबत त्याची गर्लफ्रेंड शर्वरी वाघही उपस्थित होती.

कॅटरिनाने हातावर मेहंदी काढून विकीबरोबर आणि कुटुंबासोबत डान्स केला. मेहंदीच्या ड्रेसबद्दल बोलायचे झाले, तर कॅटरिनाने मेहेंदीसाठी बहुरंगी लेहेंगा निवडला होता. तिच्या ब्लाऊजची डिझाईन आणि लेहेंग्याचा पॅटर्न अतिशय आणि आकर्षक आहे. विकीबद्दल बोलायचे झाले, तर तो त्याच्या मेहंदी सेरेमनीत अतिशय हँडसम दिसत होता. एका फोटोत कॅटरिना हाताला मेहंदी लावत आहे, तर विकी तिच्यासमोर परफॉर्म करताना दिसत आहे.

आता भावाचे लग्न आहे, तर सनी कौशल मागे कसा राहील. विकी आणि सनी कौशलची मजा आणि उत्साह या फोटोत स्पष्ट दिसत आहे. सनी कौशल राखाडी रंगाच्या पोशाखात नाचताना आणि स्प्लॅश करताना दिसत आहे. त्याच्यासोबत विकीची स्टाईलही जबरदस्त आहे. एकूणच काय तर या दोघांचा मेहंदी सोहळा खूप मजेशीर आणि आनंदाने भरलेला होता.

कॅटरिना आणि विकीने ९ डिसेंबरला राजस्थानमध्ये लग्न केले. लग्नाला दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. अभिनेत्री मिनी माथूरने एका पोस्टद्वारे सांगितले आहे की, कॅटरिना कैफला मेहंदी काढताना विकी तिला स्वतःच्या हाताने जेवण भरवत होता.

हेही वाचा :

खरंच की काय! नोरा फतेही ‘या’ गायकाला करतेय डेट? ‘हे’ फोटो पाहून चाहत्यांना आलीय शंका!

लाफ्टरक्वीन भारती सिंगची संपत्ती ऐकून डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही, शोच्या एका भागासाठी घेते ‘इतके’ मानधन

Oops Moment! रेलिंगजवळ उभी राहून मौनी रॉय देत होती झक्कास पोझ, पण अचानक ड्रेसने केली पंचायत!


Latest Post

error: Content is protected !!