×

Maja Maa | आगामी चित्रपटात समलैंगिक व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार ‘धकधक गर्ल’, चाहत्यांमध्ये उत्सुकता!

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) ‘द फेम गेम’ या वेब सीरिजद्वारे ओटीटीमध्ये पदार्पण केले, ज्याला प्रेक्षकांना खूप पसंती मिळाली. आता तिचा पुढचा ओटीटी प्रोजेक्टही जाहीर झाला आहे. एका कुटुंबाची कथा सांगणाऱ्या ‘मजा मा’ या चित्रपटात ती दिसणार आहे, मात्र हा कोणताही सामान्य कौटुंबिक चित्रपट नसेल. कारण सूत्रांच्या माहितीनुसार, माधुरी दीक्षित या चित्रपटात समलैंगिक व्यक्तीच्या भूमिकेत आहे.

माधुरी दीक्षितची पहिली ‘द फेम गेम’ सीरिज सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेली एक मर्डर मिस्ट्री होती. पण ‘मजा मा’ हा चित्रपट एका सुखी आणि किंचित गोंधळलेल्या कुटुंबावर आधारित आहे. या चित्रपटात माधुरीने प्रेमळ आईची भूमिका केली आहे. पण ती आई तेव्हा आपल्या मुलाच्या लग्नात अडथळा बनते, जेव्हा तयारीच्या वेळी तिचे समलैंगिक पात्र समोर येते. (actress madhuri dixit plays a homosexual character in amazon prime video film maja maa)

ऍमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणाऱ्या ‘मजा मा’ या चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत गजराज राव तिच्या पतीच्या भूमिकेत आहे. तर ऋत्विक भौमिक, रजित कपूर, सिमोन सिंग, बरखा सिंग हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले आहे.

समलिंगी संबंध बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांतून दाखवण्यात आले असले, तरी मुख्य पात्र म्हणून ते आजच्या काळात अधिक संवेदनशीलपणे हाताळले जात आहे. बॉलिवूडबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushman Khurrana) अशा सामाजिक विषयांवर चित्रपट निवडण्यासाठी ओळखला जातो. सध्या इतर अनेक कलाकारही त्याच वाटेवर आहेत. नुकतेच भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) ‘बधाई दो’मध्ये लेस्बियनची भूमिका केली होती. तर आता माधुरी दीक्षित सारखी दिग्गज अभिनेत्री ‘मजा मा’मध्ये समलिंगी व्यक्तिरेखा साकारत आहे.

Amazon Prime Video ला २८ एप्रिल रोजी पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये त्याने त्याच्या आगामी चित्रपट आणि वेब सीरिजची घोषणा केली होती. विशेष म्हणजे यावेळी सर्व कलाकारही उपस्थित होते आणि काहींनी लाईव्ह परफॉर्मन्सही दिला. या कार्यक्रमादरम्यान माधुरी दीक्षितच्या आगामी ‘मजा मा’ या चित्रपटाची माहिती देण्यात आली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post