पुन्हा एकदा मोनालीसाचा इंटरनेटवर जलवा; कूली नंबर वनच्या गाण्यावर केलाय नंबर वन डान्स, पाहा व्हिडीओ


बिग बॉसची माजी स्पर्धक आणि भोजपुरी चित्रपट सृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री म्हणजे ‘मोनालिसा’. मोनालिसा नेहमीच लाईम लाईटमध्ये असते. तिचा अभिनय, तिचा डान्स आणि तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट सतत चर्चेचा विषय ठरतात. आताही ही अभिनेत्री तिच्या एका डान्स व्हिडिओमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. नुकताच मोनालिसाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती वेगवेगळ्या मुव्हवर डान्स करताना दिसत आहे. मोनालिसाच्या या डान्सने तिचे चाहते खूपच इंप्रेस झाले आहेत. ती ‘वरूण धवन’चा चित्रपट ‘कूली नंबर 1’ च्या रिमेकवर डान्स करताना दिसत आहे.

मोनालिसाचा माईंड ब्लोविंग डान्स
” माईंड ब्लोविंग लडकी फसाई मम्मी कसम मै तो गया डाय और दफा 302 मुझे लगवाई.. ” या गाण्यावर मोनालिसा व्हिडीओमध्ये डान्स करताना दिसत आहे. खरंतर हे गाणे ‘वरुण धवन’ आणि ‘सारा अली खान’ यांच्यावर चित्रित केले गेले आहे. परंतु या गाण्याच्या लिरीक्सची सुरवात मोनालिसाच्या नावाने होते. या गाण्याला ‘उदित नारायण’ आणि ‘मोनाली ठाकूर’ यांनी गायले आहे.

‘कुली नंबर 1’ हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी मोनालिसाया गाण्याचा आधार घेत आहे. या व्हिडीओला शेअर करत मोनालिसा असे लिहते की, ” मला खूप दिवसांपासून या गाण्यावर डान्स करायचा होता, आता कुठे जाऊन मला ती संधी मिळाली.”

मोनालिसा नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एका पेक्षा एक डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते आणि तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. या व्हिडीओमध्ये मोनालीसा पर्पल कलरच्या ट्रान्सफरन्ट क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तीचा फक्त डान्सचं नव्हे तर तिचे हावभाव देखील खूप कमालीचे आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-
तिच्या नावाची सोशलवर असते बारा महिने चर्चा, फोटोंवर पडतो लाईक्सचा पाऊस; आज तुम्हीही ओळख करून घ्या
सौंदर्यांची खाण! या  पाच भोजपुरी अभिनेत्रींपुढे फिक्या पडतात बॉलीवूड सिनेतारका
बीग बॉसमध्ये लग्न केलेल्या त्या जोडप्याने साजरा केला लग्नाचा चौथा वाढदिव


Leave A Reply

Your email address will not be published.