‘नागिन जलवा!’ मॉनी रॉयचा ‘जलेबी बेबी’ गाण्यावरील डान्स पाहून चाहत्याची भन्नाट कमेंट


सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मौनी रॉय हिचे नावही आवर्जुन घ्यावं लागेल. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने आपला एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. जो चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. मौनीचा डान्स पाहून चाहत्यांना ‘नागिन’ची आठवण झाली आहे. (Actress Mouni Roy Dance On Jalebi Baby People Compares Her With Naagin)

खूपच सुंदर दिसतेय मौनी
मौनी आपल्या ताज्या पोस्टने इंस्टाग्रामवर अक्षरश: आग लावत आहे. तिने काही फोटोंसोबतच व्हिडिओही शेअर केले आहेत. या व्हिडिओत ती ‘जलेबी बेबी’ गाण्यावर भन्नाट डान्स करत आहे. मौनीच्या लूकने लोकांना ‘नागिन’ची आठवण करून दिली आहे. तिच्या या व्हिडिओला १५ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

तिच्या एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “खरंच ब्लॅक कोब्रा दिसत आहे.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “नागिन डान्समध्ये तुम्ही नागिनलाही पराभूत कराल.” आणखी एक चाहता म्हणाला की, “नागिन जलवा.”

पुस्तकप्रेमी आहे मौनी
अनेक बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे मौनीदेखील पुस्तकप्रेमी आहे. ती नेहमीच पुस्तके वाचताना दिसते. सोशल मीडियावर ती पुस्तकांतील कोट्सही शेअर करते. तिचे फिटनेस व्हिडिओही खूपच प्रेरणादायी असतात. मौनी रॉय ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे.

याव्यतिरिक्त ती ‘बिग बॉस’, ‘नच बलिये’ आणि ‘झलक दिखला जा’ यांसारख्या शोमध्येही झळकली आहे. मौनीने ‘नागिन १’, ‘नागिन २’ आणि ‘नागिन ३’ या मालिकेत काम करून चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान मिळवले आहे.

आता ती पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ती अयान मुखर्जी यांच्या ब्रह्मास्त्रमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन या दिग्गज कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘चूक भूल माफ करा’, म्हणत गाणं गाताना दिसली ‘स्वीटू’; सुमधूर व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती

-असे काय झाले की, नेहा कक्कर लागली रडू? व्हिडिओला मिळाले ७६ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-निलेश साबळे अन् अंकुर वाढवेची ‘पोपटचंपी!’ ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरून मजेदार व्हिडिओ व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.