सौंदर्यच असे होते की ‘तिला’ रोड क्रॉस करताना पाहाताना गाडीवरुन पडले असते अमिताभ बच्चन


आज हिंदी सिनेमातील ५० आणि ६० चे दशक गाजवणारी अभिनेत्री नूतन यांची पुण्यतिथी. प्रभावी आणि जिवंत अभिनय ही त्यांची अभिनय शैली सर्वानाच वेड लावून गेली. नूतन यांचे सौंदर्य आणि त्यावर चार चांद लावणारे त्यांचे बोलके डोळे खूपच आकर्षक होते. २४ जून १९३९ मध्ये मुंबईत एका मराठी संपन्न घरात त्यांचा जन्म झाला. नूतन यांना अभिनयाचे बाळकडू घरातूनच प्राप्त झाले. त्यांची आई शोभना समर्थ या प्रसिद्ध हिंदी आणि मराठी अभिनेत्री होत्या. तर त्यांचे वडील कुमारसेन समर्थ होते.

नूतन यांनी बालकलाकार म्हणून नल दमयंती सिनेमा केला आणि ‘हमारी बेटी’ हा त्यांच्या आईने तयार केलेल्या सिनेमातून त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्या मिस इंडिया पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री ठरल्या. त्यांना नेहमी साध्या पोषाखातच पाहिले जायचे. त्यांना चमक धमक बिलकुल आवडत नव्हती. मात्र १९५८ साली आलेल्या ‘दिल्ली का ठग’ या सिनेमात त्यांनी त्यांची ही प्रतिमा पुसून टाकली आणि त्यांनी स्विमिंग सूट घालून सिनेमात सीन दिला. यामुळे त्यांची बोल्ड इमेज तयार झाली. त्या सीनमुळे त्यांच्यावर प्रचंड टीका देखील झाली.

मात्र त्यानंतर लगेचच त्यांनी सीमा आणि सुजाता सिनेमांमधून त्यांनी पुन्हा त्यांचे साधे रूप जगासमोर आणले. १९५९ साली नूतन यांनी लेफ्टिनेंट कमांडर रजनीश बहल यांच्यासोबत लग्न केले. लग्नानंतरही त्यांचे अभिनयाचे करियर चालू होते. त्यांनी ‘हमलोग’, ‘शीशम’, ‘परबत’ आणि ‘आगोश’ अशा सिनेमांमधून काम केले, आणि त्या काही काळ लंडनला निघून गेल्या. परत आल्यावर त्यांनी सीमा सिनेमात काम केले आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला.

नूतन यांनी सुजाता, बंदिनी, मैं तुलसी तेरे आंगन की, सीमा, सरस्वती चंद्र आणि मिलन अशा सिनेमांमधून दर्जेदार अभिनय करत अनेक पुरस्कार देखील मिळवले. नूतन यांनी महिलाप्रधान सिनेमानं खूप प्राधान्य दिले. त्यांना लिखाण, बॅडमिंटन, ड्रायविंग, घोडेस्वारी अशा गोष्टी खूप आवडत.

नूतन यांच्याशी संबंधित अमिताभ बच्चन यांचा एक किस्सा खूपच रंजक आहे. खुद्द अमिताभ यांनी याबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. अमिताभ जेव्हा दिल्ली विद्यापीठात शिकायचे. एकदिवस अमिताभ स्कुटरवरून जात असताना त्यांनी नूतन यांना त्यांच्या पतीसोबत रोड क्रॉस करताना पाहिले, आणि ते स्कुटरवरुन पडता पडता वाचले.

नूतन यांनी त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये देखील काम केले, बिमल रॉय यांच्या ‘बंदिनी’ सिनेमाच्या वेळी त्या प्रेग्नन्ट होत्या. असे सुद्धा म्हटले जाते की त्यांनी एकदा संजीव कपूर यांना चापट देखील मारली होती. त्यावेळी त्या अफेयरच्या बातम्यांनी खूपच नाराज होत्या. सेटवर संजीव त्यांना चिडवत होते, त्यांनी संजीव यांना अनेकदा शांत राहायला सांगितले, आणि नंतर न राहून त्यांच्या गालात मारली.

नूतन यांच्या सौंदर्याने त्यांना अनेक अभिनेत्यांनी मागणी घातली होती. त्यात शम्मी कपूर, राजेंद्र कुमार या मोठ्या अभिनेत्यांचा देखील समावेश होता. परंतू त्यांनी त्या सर्वांना नकार दिला.  नूतन यांचा मुलगा मोहनीश बहल देखील एक उत्तम अभिनेते आहे, मात्र त्यांना त्यांच्या आई इतके यश मिळाले नाही. आता नूतन यांच्या नातीने प्रनूतनने देखील अभिनयात पदार्पण केले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.