Saturday, March 2, 2024

‘मी रडत होते पण 10 व्या मिनिटाला मला…’ प्रिया बेर्डे यांनी सांगितला कठीण काळातील स्वामींचा अनुभव

आपल्या अभिनयाच्या जादूने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये 90चे दशक सदस्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बेर्डे. (priya berde) अनेक मालिका नाटक आणि चित्रपटात काम करून त्यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा त्यांच्या प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे. सध्या त्या चित्रपट सृष्टीमध्ये सक्रिय आहेत तरी राजकारणात देखील त्यांचा चांगला सहभाग दिसून येत आहे.

प्रिया बेर्डे या आत्तापर्यंत त्यांच्या अनेक वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेल्या आहेत. आता देखील त्यांचे असेच एक वक्तव्य आले आहे. जे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे. माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रिया बेर्डे यांनी त्यांच्या करियर तसेच खासगी आयुष्याबद्दल आणि गोष्टींचे खुलासे केले आणि यादरम्यानच यावेळी यांनी स्वामींचा आलेल्या साक्षात्कार त्यांनी सांगितले आहे.

यावेळी त्या म्हणाल्या की, “मधल्या काळात म्हणजे तेरा आणि 14 वर्षांपूर्वी माझ्याकडे काहीच काम नव्हते. तेव्हा मी काय करू असा प्रश्न मला पडला होता. काहीच मार्ग दिसत नव्हता. सगळी काम बंद झाली होती मुलांच्या फी भरायच्या होत्या.”

पुढे द्या म्हणाल्या की, “दादरच्या स्वामी समर्थांच्या मठातला फोटो माझ्या डोळ्यासमोर आला. त्यावेळी मी रडत होते. दहाव्या मिनिटाला सोलापूर वरून कॉल आला की, अक्कलकोटला एक कार्यक्रम आहे. तुम्हाला यायचा आहे तुम्हाला एवढं मानधन मिळेल. हा चमत्कार घडला तिथेच मी दंडवत घातला. आणि यापुढे अक्कलकोटला दरवर्षी मी येईल असं सांगितले. तेव्हापासून स्वामींचे धरलेले पाय मी कधीच सोडणार नाही. स्वामींचे नाव माझ्या नेहमीच तोंडात असतं. वाईट गोष्टीतून त्यांनी मला बाहेर काढला आहे. माझी त्यांच्यावर फार श्रद्धा आहे.”

अशाप्रकारे प्रिया बेर्डे यांनी कठीण काळात त्यांना स्वामींनी कशाप्रकारे साथ दिली. या सगळ्याचा खुलासा त्यांनी मुलाखतीमध्ये केलेला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

बहुप्रतिक्षित ‘सालार’ चित्रपटाच ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला, प्रभास दिसला जबरदस्त अवतारात
पंकज कपूर यांनी१६ वर्षांच्या नीलिमा यांच्याशी केले होते लग्न, मात्र केवळ ९ वर्षातच झाला घटस्फोट

हे देखील वाचा