Saturday, July 27, 2024

न्यूड कलरच्या ड्रेसमध्ये खुलून आले ऋतुजा बागवेचे सौंदर्य, फॅन्ससोबतच कलाकार देखील करतायेत कौतुकाचा वर्षाव

सोशल मीडिया हा कलाकारांच्या आयुष्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यांच्या चाहत्यांशी जोडून राहण्यासाठी कलाकार नेहमीच त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. यात ऋतुजा बागवे ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. तिचे अनेक ग्लॅमरस तसेच पारंपारिक लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

ऋतुजाने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने न्यूड कलरचा एक सुंदर ड्रेस घातला आहे. यासोबत तिने केस मोकळे सोडले आहेत. या लूकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. तिने कानात डायमंड ईअरिंग आणि हातात ब्रेसलेट घातले आहेत. (Actress Rutuja bagwe share her morden look photos on social media)

अनेकांना तिचा हा लूक खूप आवडला आहे. अनेक कलाकार देखील फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोवर अश्विनी केसकर हिने हार्ट ईमोजी पोस्ट केल्या आहेत. यासोबतच नंदिता पाटकर, सुबोध भावे आणि आदिष वैद्य यांनी कमेंट्स केल्या आहेत. तिने शेअर केलेल्या या फोटोला सात हजारापेक्षाही जास्त लाइक्स मिळाले आहेत.

ऋतुजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००८ मध्ये ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पुढे तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’, ’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या.

यानंतर ऋतुजाने ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. तसेच तिने ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत देखील सुबोध भावेसोबत काम केले आहे. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती

-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत

-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा

हे देखील वाचा