सायरा बानो यांची बिघडली तब्येत, ७७ वर्षीय अभिनेत्री आयसीयूमध्ये दाखल

बॉलिवूडच्या जगातून चाहत्यांना चिंतेत पाडणारी बातमी समोर येत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि दिलीप कुमार यांच्या बेगम साहिबा सायरा बानो यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ७७ वर्षीय सायरा बानो यांना ३ दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रक्तदाबाच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. एका वृत्तवाहिनीला मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना अलिकडेच आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

चिंतेत भर टाकणारी बाब म्हणजे, त्यांची ऑक्सिजनची पातळी सातत्याने कमी होत आहे, ज्यामुळे त्यांना श्वास घेण्यात अडचण येत आहे. दिलीप कुमार यांच्यासोबत ५४ वर्षे संसार करणाऱ्या सायरा बानो त्यांच्याशिवाय एकट्या पडल्या आहेत. मात्र काळजी करण्यासारखे काही नसले, तरी त्यांना आता काही दिवस रुग्णालयातच राहावे लागेल. (saira banu has been admitted in hinduja hospital shifted to icu)

सायरा बानो यांनी १९६१ मध्ये ‘जंगली’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर त्या ‘पडोसन’, ‘पूरब और पश्चिम’, ‘जमीर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसल्या. सायरा वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी दिलीप कुमार यांच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या. अभिनेत्रीने याच वयात ठरवले होते की, त्यांना दिलीप कुमारांशीच लग्न करायचे आहे. विशेष म्हणजे त्या दिलीप कुमारांपेक्षा २२ वर्षांनी लहान होत्या.

सायरा बानो यांना अभिनयाचा वारसा लाभला होता. त्यांच्या आई नसीम बानो ३० आणि ४०च्या दशकातील मोठ्या अभिनेत्री होती. त्याच वेळी, त्यांचे वडील मिया एहसान-उल-हक एक मोठे निर्माते होते. सायरा बानो लहान असतानाच त्यांचे आई आणि वडील विभक्त झाले होते. शिवाय त्यांचे बालपण लंडनमध्ये गेले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडच्या ‘अशा’ जोड्या जे एकमेकांपासून राहतात वेगवेगळे, पण अजूनही घेतला नाही घटस्फोट

-हद्द झाली! अमायरा दस्तूरने घातली ‘अशी’ बिकिनी; नेटकरी म्हणाले, ‘यांना नग्न व्हायला…’

-राखी सावंतने केली नाकाची शस्त्रक्रिया; व्हिडिओ शेअर करत सांगितले शस्त्रक्रियेचे कारण

Latest Post