भारीच ना! काळ्या रंगाच्या साडीत शिल्पा शेट्टी दिसतेय एकदम सुंदर; किंमत वाचून फिरतील डोळे


बॉलिवूडमधील फिटनेस आयकॉन म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी होय. शिल्पाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपल्या अभिनयाव्यतिरिक्त ती डान्स आणि फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. शिल्पा सध्या ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’मध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे. यामध्ये एकीकडे स्पर्धक आपल्या डान्सचा जलवा दाखवतात, तर दुसरीकडे शिल्पाही आपल्या स्टाईलमुळे चर्चेचा विषय ठरत असते. अशातच आता तिच्या साडीने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.

काळ्या रंगाच्या साडीत दिसतेय खूपच सुंदर
शिल्पा शेट्टीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती मिरर वर्क असलेल्या काळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. मिरर वर्क असलेली साडी आणि हेवी ब्लाऊझमध्ये शिल्पा कमालीची सुंदर दिसत आहे. या साडीत शिल्पाचा लूक इतका आकर्षक आहे की, काही तासांतच या फोटोला २ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

‘इतकी’ आहे साडीची किंमत
शिल्पाचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर साडीची चर्चा होणे साहजिकच होते. चाहत्यांना विशेषत: महिला चाहत्यांना या साडीविषयी जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच वाढली असेल. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’च्या येत्या एपिसोडमध्ये शिल्पाचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. यामध्ये शिल्पाही दिसणार आहे. शिल्पाने प्रसिद्ध डिझायनर रिती अर्नेजाच्या कलेक्शनमधील साडी नेसली आहे. ही साधीसुधी साडी नसून खूपच महागड्या कलेक्शनमधील पीस आहे. शिल्पाची ही साडी काळ्या रंगाच्या वेल्वेट स्कर्ट साडीवर क्रॉप टॉप आहे. यासोबतच ओढणीही जोडलेली आहे. पूर्ण ब्लाऊझ आणि ओढणीवर सुंदर नक्षीकाम आहे. या साडीची किंमत ४६ हजार रुपये आहे.

१२ वर्षांनंतर चित्रपटात पुनरागमन
‘बाझीगर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी शिल्पा जवळपास १२ वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. आता ती चित्रपटात पुनरागमन करणार आहे. ती लवकरच ‘हंगामा २’ आणि ‘निकम्मा’मधून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पावसाळ्या संध्याकाळी होणारे काही मूड…’, म्हणत भजी खाण्यापूर्वी शेतात फिरताना दिसतोय सुव्रत जोशी

-जेव्हा कृष्णा अभिषेकने घेतले होते अनिल कपूरचे रूप; पाहून लोटपोट झाली होती सोनम कपूर

-‘तूच माझ्या जगण्याचा आधार’, सपना चौधरीच्या सुंदर व्हिडिओवर चाहत्याची प्रेमळ कमेंट


Leave A Reply

Your email address will not be published.