मोज्यांनी बनलेला टॉप घातल्यामुळे उर्फी जावेद ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘कृपया, कुणीतरी तिला कपडे दान करा’


कलाकार आणि वाद यांचं जरा जुनंच नातं आहे. दरदिवशी या ना त्या कारणावरून कलाकार वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात. यामध्ये अभिनेत्री उर्फी जावेदच्या नावाचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. कारण, उर्फी मागील काही काळापासून आपल्या ड्रेसिंगमुळे जोरदार ट्रोल होत आहे. ती नेहमीच तिच्या आऊटफिट्समुळे माध्यमांचे लक्ष वेधत असते. अशात ती आपल्या क्रॉप टॉपमुळे ट्रोल होत आहे.

उर्फी जांभळ्या रंगाची पँट परिधान करून जांभळ्या रंगाच्या मोज्यांनी बनलेला क्रॉप टॉप आणि कापलेला टी- शर्ट परिधान करून बाहेर पडली होती. यादरम्यान तिला पाहून पॅपराजींनी तिचे फोटो काढले. मात्र, उर्फीला आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे कसलीही अडचण असल्याचे दिसले नाही. (Actress Urfi Javed Wear Crop Top Made of Socks People Says Please Donate Her Clothes)

सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसतेय की, उर्फीने पॅपराजींना पाहून केवळ हात हालवून अभिवादनच केले नाही, तर कॅमेऱ्याकडे पाहून पोझही दिले. तिचे कापलेला टी- शर्ट हवेप्रमाणे उडताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे सांभाळताना ती बिल्कुल चिंताग्रस्त दिसली नाही.

उर्फीचे हे आऊटफिट पाहून सोशल मीडिया युजर्स तिला जबरदस्त ट्रोल करत आहेत. तसेच म्हणत आहेत की, “कृपया, कुणीतरी तिला कपडे दान करा.”

उर्फीने आपल्या या आऊटफिटचे फोटो इंस्टाग्रामवरही शेअर केले आहे. यासोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “क्रॉप टॉप सॉक्सने बनवले आहे आणि आपल्या टी- शर्टला अर्धे कापले आहे. अशाप्रकारे रेडी झालाय आऊटफिट.”

तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे. एकाने लिहिले की, “माझ्या घरात खूप कपडे पडले आहेत, घेऊन जा माझ्याकडून.”

‘बिग बॉस ओटीटी’चा भाग राहिलेली उर्फी जावेद नेहमीच आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अवतारातील फोटो शेअर करून चर्चेत येत असते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रिया बापटने केला लाडू बनवतानाचा व्हिडिओ शेअर; ‘हा’ कलाकार म्हणाला, ‘मला पण पाहिजे’

-‘आली गौराई अंगणी…’, म्हणत मराठमोळी अभिनेत्री समिधाने सुंदर फोटो केले शेअर; एकदा पाहाच

-रिलायन्स एन्टरटेन्मेंट अन् टी- सीरिजमध्ये मोठी भागीदारी; हजारो कोटींच्या गुंतवणुकीतून बनवणार ‘हे’ १० चित्रपट


Leave A Reply

Your email address will not be published.