Saturday, June 15, 2024

कहरच ना! उर्वशीचा लेटेस्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला झक्कास लूक, पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) केवळ तिच्या सौंदर्यासाठीच नाही, तर बॉलिवूड चित्रपटसृष्टीत तिच्या हॉटनेससाठीही प्रसिद्ध आहे. उर्वशी तिच्या खास स्टाईलमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करते. उर्वशी तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करून इंटरनेटवर धुमाकूळ घालत असते. तिच्या लेटेस्ट फोटोंची आणि व्हिडिओंचीही चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अनेकवेळा तिला तिच्या हॉट ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले आहे. मात्र, या सर्व गोष्टींची पर्वा न करता उर्वशीने पुन्हा एकदा तिचा एक बोल्ड व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

उर्वशीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा लेटेस्ट व्हिडिओ पोस्ट केला आहे. या ग्लॅमरस व्हिडिओमध्ये ती पूलसाईडला लाल रंगाची ब्रालेट परिधान करून तिचा बोल्ड लूक दाखवताना दिसत आहे. यादरम्यान तिचा लूक इतका बोल्ड आहे की, जणू ती पाण्याला आग लावताना दिसत आहे. त्याचवेळी तिच्या डोळ्यावर चष्मा आहे आणि केस मोकळे आहेत. जे तिची शोभा अधिकच वाढवत आहेत.

उर्वशीने हा ग्लॅमरस व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “प्रामाणिकपणे मी मनाने जलपरी आहे.” अशाप्रकारे तिची जलपरी स्टाईल चाहत्यांची मने जिंकत आहे. चाहते तिचे कौतुक करत थकत नाहीत. कोणी तिला ‘अप्रतिम’ म्हणत आहेत, तर कोणी ‘खूप सुंदर’ म्हणत आहेत. तिच्या या व्हिडिओला ५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे, तर ती लवकरच एका बिग बजेट तमिळ चित्रपटातून तमिळमध्ये पदार्पण करणार आहे. तिचा हा चित्रपट एक विज्ञान-कथा चित्रपट आहे. ज्यामध्ये ती मायक्रोबायोलॉजिस्ट आणि आयआयटीयनची भूमिका साकारणार आहे. यासोबतच ती द्विभाषिक थ्रिलर ‘ब्लॅक रोज’मध्ये दिसणार आहे. उर्वशी ‘थिरुतू पायले २’ च्या हिंदी रिमेकमध्येही काम करत आहे.

याशिवाय उर्वशी जिओ स्टुडिओच्या वेब सीरिज ‘इन्स्पेक्टर अविनाश’मध्ये रणदीप हुड्डासोबत मुख्य भूमिकेत आहे. वेबसीरिज सुपर कॉप अविनाश मिश्रा आणि पूनम मिश्रा यांच्या सत्यकथेवर आधारित बायोपिक आहे. गुरू रंधावा आणि मोहम्मद रमादान यांच्यासोबत सादर केलेल्या ‘वर्साचे बेबी’ आणि ‘डूब गए’ या गाण्यांना अभिनेत्रीला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अगग! अभिजीत बिचकुलेला टॉयलेटला जाणे वाटते बोरिंग, कारण ऐकून राखी सावंतने दिली ‘अशी’ रिऍक्शन

-फॅनने प्रियांकाला आय लव्ह यू म्हटल्यावर निकने दिली ‘ही’ रिऍक्शन

-सेटवर उशिरा पोहचल्यामुळे किरण खेर यांनी बादशाहला फटकारले, थोडक्यात वाचला बादशहा

हे देखील वाचा