Thursday, July 18, 2024

आधी करिअरचं बघू म्हणत, ‘या’ अभिनेत्रींनी करुन ठेवले एग्ज फ्रिजिंग्स, कोणत्याही वयात होऊ शकतील आई

हिंदी चित्रपट जगतातील अभिनेत्री आपल्या करिअरसाठी प्रचंड मेहनत घेतात. या प्रचंड स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी त्यांना बराच काळ संघर्ष करावा लागतो. चित्रपट आणि अभिनय क्षेत्रात रोज अनेक अभिनेत्री आपले नशीब आजमावण्यासाठी येत असतात. या अभिनेत्री त्यांच्या करिअरमध्ये इतक्या गुंतून जातात की त्यांचे लग्न करायचे आई व्हायचे वयही निघून जाते. आणि ठराविक वयाची मर्यादा ओलांडल्यानंतर आई होणे स्त्रीसाठी खूप त्रासदायक असते. मात्र नव्यानेच विकसित झालेल्या एग फ्रिजिंग तंत्रज्ञानाने या अभिनेत्रींना कोणत्याही वयात आई होण्याचे वरदान दिले आहे. ज्याची प्रक्रिया हिंदी चित्रपट जगतातील अनेक अभिनेत्रींनी करुन ठेवली आहे ज्यामुळे त्या सध्या  त्यांच्या कामात, चित्रपटात, भविष्याच्या नियोजनात व्यस्त असल्या तरी त्या यानंतरही आई होण्याचे सुख त्रास न होता अनुभवू शकतात. कोण आहेत या अभिनेत्री ज्यांनी ही प्रक्रिया करुन ठेवली आहे, चला जाणून घेऊ. 

राखी सावंत (Rakhi Sawant)  –

अभिनेत्री राखी सावंत सध्या तिच्या करिअरमध्ये व्यस्त आहे. मात्र भविष्यात कधीही आई होण्याचा विचार आल्यास कोणताही ताही त्रास होऊ नये म्हणून एग्ज फ्रिजिंग्स या नाविन्यपुर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करुन ठेवला आहे. याचा खुलासा तिने स्वःत एका कार्यक्रमात केला होता.

सुकीर्ती कंदपाल (Sukirti Kandpal)

स्टार वनवर प्रसारित होणाऱ्या ‘प्यार की ये एक कहानी’ या मालिकेने प्रसिद्ध झालेली टीव्ही अभिनेत्री सुकिर्ती हिचाही या यादीत समावेश आहे. मात्र सुकिर्तीला भविष्यात कधी आई व्हायला आवडेल याचा खुलासा तिने अद्याप केलेला नाही.

एकता कपूर (EKta Kapoor)  –

टीव्ही क्वीन एकता कपूरने वयाच्या 36 व्या वर्षीच एग्ज फ्रिजिंगची प्रक्रिया करुन ठेवली आहे . सध्या ती अविवाहीत आहे मात्र प्रत्येक मुलीप्रमाणेच एकतालाही माहित होते की ती कधी ना कधी आई होणार आहे आणि त्यामुळे तिला त्रास होऊ नये, म्हणून एकताने हे पाऊल उचलले आहे.

तनिषा मुखर्जी (Tanisha Mukherjee) –

या यादीत बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोलची बहीण आणि तनुजाची मुलगी तनिषा मुखर्जीचाही समावेश आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी तिने एग्ज फ्रिजिंगची प्रक्रिया केली होती. एग्ज फ्रिजिंगची प्रक्रिया केल्यानंतर तनिषाला वजन वाढण्याची समस्या उद्भवली तेव्हा तिने हा खुलासा केला होता.

कोर्टनी कार्दशियन (Kourtney Kardashian) –

हॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कार्दशियन बहिणींपैकी एक असलेल्या कोर्टनीनेही एग्ज फ्रिजिंगची प्रक्रिया केली आहे. ‘कीपिंग अप विथ द कार्दशियन्स’ या तिच्या रिअलिटी शोसाठी ओळखली जाणारी कर्टनी आता तीन मुलांची आई आहे पण तिने काही वर्षांपूर्वी एग्ज फ्रिजिंगची प्रक्रिया केली होती.

किम कार्दशियन  (Kim Kardashian) –

कार्दशियन भगिनींमध्ये  सर्वात लोकप्रिय असलेल्या किम कार्दशियनचे नाव क्वचितच कोणाला माहीत असेल. ती तिच्या बॉडी फिगरसाठी जगभर प्रसिद्ध आहे आणि तिची बहीण कोर्टनी एग्ज फ्रिजिंगची प्रक्रिया केली आहे. यासाठी डॉक्टरांनी तिला सल्ला दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा