Friday, December 8, 2023

वडिलांच्या निधनानंतर आयुष्मान ‘अशा’ प्रकारे घेताेय आईची काळजी; युजर्स म्हणाले, ‘मुलगा असावा तर…’

आयुष्मान खुरानाचे कुटुंब सध्या खूप दुःखातून जात आहे. कारण, गेल्या महिन्यात अभिनेत्याच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हापासून त्यांच्या कुटुंबात दुःखाचे वातावरण आहे. दरम्यान, आयुष्मान त्याच्या कुटुंबासह विमानतळावर दिसला. जिथे आयुष्मान आणि त्याच्या आईसोबत अपारशक्ती खुराना देखील होता. यादरम्यान दोघेही त्यांची आई पूनमची काळजी घेताना दिसले.

आयुष्मान खुराना (ayushmann khurrana) सोमवारी (दि. 5 जुन)ला त्याच्या कुटुंबासह विमानतळावर दिसला. यादरम्यान, आयुष्मानने फिकट हिरव्या टी-शर्ट आणि काळ्या हुडीवर सनग्लासेससह मास्क लावला होता, तर अपारशक्तीने निळ्या टी-शर्टसह क्रीम जॅकेट आणि मॅचिंग हुडी घातली होती. या सगळ्यात अपारशक्ती आणि आयुष्मान त्यांच्या आईची खूप काळजी घेताना दिसले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

एका आठवड्यापूर्वी आयुष्मानने वडिलांसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्याने आईच्या जबाबदाऱ्यांबद्दल सांगितले. त्याने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आईची काळजी घ्यायची आहे आणि नेहमी सोबत राहायचे आहे. वडिलांसारखे होण्यासाठी तुम्हाला तुमच्या वडिलांपासून खूप दूर जावे लागेल. पहिल्यांदाच जाणवत आहे की, वडील आपल्यापासून खूप दूर आणि खूप जवळ आहेत. धन्यवाद बाबा… तुमच्या संगोपनासाठी, प्रेमासाठी, विनोदबुद्धीबद्दल आणि अनेक सुंदर आठवणींसाठी.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

आयुष्मान खुरानाचे वडील ज्योतिषाचार्य पी खुराना यांचे 19 मे 2023 रोजी निधन झाले. पी खुराना हे हृदयाशी संबंधित आजारांशी झुंज देत होते. मोहालीच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचारही सुरू होता, पण त्यानंतरही त्यांचा जीव वाचू शकला नाही आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (after father death p khurrana actor aparshakti and actor ayushmann khurrana were seen with their mother at the airport see video )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“आम्ही विनोदवीर नाही”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापचे मोठे वक्तव्य, म्हणाला…

इलियानाने प्रेग्नेंसीदरम्यान बिकिनी घालून समुद्रकिनाऱ्यावर लावली आग, एकदा पाहाच फाेटाे

हे देखील वाचा