दिग्दर्शकाने कट म्हणूनही हिमांश कोहलीसोबत रोमान्स करत राहिली ‘ही’ अभिनेत्री; म्हणाली, ‘मला खूपच…’


मनोरंजनसृष्टीमध्ये शूटिंगच्या वेळी अनेक गंमतीजमती, किस्से घडत असतात. जे कलाकारांसाठी सुखद आठवणींसारखे कायम त्यांच्यासोबत राहतात. त्यांच्यासोबत घडलेले किस्से, घटना कलाकार अनेकदा मीडियासमोर मुलाखतींदरम्यान मांडताना दिसतात. कधी कधी काही किस्से ऐकून प्रेक्षकांना बऱ्याचदा नवल वाटते. अशा किस्स्यांचा वापर प्रमोशनसाठी देखील करण्यात येतो.

असाच एक किस्सा अभिनेत्री आकांशा पुरीने नुकताच एका मुलाखतीदरम्यान सर्वांना सांगितला आहे. अभिनेत्री आकांक्षा पुरी आणि अभिनेता हिमांश कोहली लवकरच एका म्युझिक व्हिडिओमध्ये सोबत दिसणार आहे. या म्युझिक व्हिडिओच्या शूटिंगसाठी हे दोघे काश्मीरमध्ये आहेत. काश्मीर नेहमीच एक शूटिंगसाठी एक उत्तम रोमँटिक जागा म्हणून ओळखले जाते. अनेकदा या ठिकाणी रोमँटिक सीन्स, गाणी शूट केली जातात.

अशाच एका गाण्याचे हिमांशू आणि आकांशा चित्रीकरण करत आहे. यावेळी घडलेला एक मजेशीर किस्सा आकांक्षाने सर्वांना सांगितला. ती म्हणाली, “अखेर कोणीतरी माझ्याकडून स्क्रिनवर रोमान्स करून घेतला. काश्मीरमध्ये शूट करताना रोमान्स नाही केला तर काय केले. अतिशय थंड वातावरण, थंड वारे आणि मी माझ्या सहकलाकाराच्या मिठीत. बस अजून काय पाहिजे. असाच एक शॉट आम्ही देत होतो. ज्यात दिग्दर्शकाने कट म्हटले, तरी मी रोमान्स करण्यात व्यस्त होते. सीनमध्ये मी हिमांशूच्या मिठीत होती आणि त्याला गोंजारत होते. मला असे करण्यात खूप मजा येत होती. त्यात सीन ओके झाला आणि दिग्दर्शकाने कट म्हटले, तरी मी त्याला सोडतच नव्हते. आम्ही खूप चांगले मित्र असल्याने, आमच्या दोघांची केमिस्ट्री खूप चांगली आहे. तुम्हाला या गाण्यात ती दिसेलच. आमचे गाणे लवकरच प्रदर्शित होईल. पुढे पुन्हा हिमांशुसोबत काम करण्याची संधी मिळाली तर नक्की करेल.”

 

हिमांशू काही काळापूर्वी नेहा कक्करसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे चांगलाच चर्चेत आला होता. तर आकांशा बिग बॉस फेम पारस छाबरासोबत असलेल्या रिलेशनमुळे आणि ब्रेकअपमुळे चांगलीच चर्चेत आली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘एवढी नकारात्मकता आणता तरी कुठून?’ ‘सिडनाझ’बाबत पसरलेल्या बातम्यांवर सिद्धार्थचे उत्तर

-शिल्पा शेट्टी बराचद्या सापडलीय वादाच्या भोवऱ्यात; अंडरवर्ल्ड कनेक्शनचा होता आरोप, तर बोल्ड फोटोशूटमुळेही होती ती चर्चेत

-‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाच्या लाईन प्रोड्युसरने नैराश्यामुळे केली आत्महत्या; अनुपम खेर यांनी पोस्टद्वारे दिली माहिती


Leave A Reply

Your email address will not be published.