Thursday, June 13, 2024

रिंकू राजगुरुसोबतच्या व्हायरल फोटोंवर आकाश ठोसरने सोडलं मौन; अभिनेता म्हणाला…

मराठी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात कमी वयात केली. काहींना लगेच यश मिळाले, तर काहींना त्या यशासाठी खूप मेहनत करावी लागली. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू होय. रिंकूने वयाच्या १५ व्या वर्षी सैराट या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या एकाच चित्रपटाने रिंकूला यशाच्या शिखरावर नेऊन पोहचवले. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

सैराट चित्रपटाने रेकाॅर्डब्रक कमाई केली. या चित्रपटात काम केल्यानंतर आर्ची आणि परश्या म्हणजे रिंकू (Rinku Rajguru) आणि आकाश ठोसर (Akash Thosar) खूप प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात होते. त्या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. चाहत्यांमध्ये या दोघांच्या नात्याची चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर खुद्द आकाशने मौन तोडले आहे.

आकाश म्हणाला की, “मला रिंकूसोबत फोटो शेअर केलेल पाहूण खूप मज्जा वाटते. त्यामुळे मी आणि रिंकू एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करतो. इतकच नाही तर रिंकूला देखील खूप मज्जा येते. ज्यावेळी आमच्या दोघांचा फोटो पोस्ट केला जातो. त्यावेळी आम्ही एकत्र असतो. त्यावेळी मी आणि रिंकू आता फक्त मज्जा बघ, असे एकमेकांना सांगत असतो. प्रेक्षक आजही आमच्या जोडीवर भरभरून प्रेम करतात.”

तसेच पुढे बोलताना आकाश म्हणाला की, “आम्ही आज जे काही आहोत ते फक्त आणि फक्त प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे आणि आर्शिवादामुळेच. आम्ही दोघे एकमेकांना डेट करतो या सर्व अफवा आहेत. आम्ही दोघे खूप चांगले मित्र आहोत.” आकाश विषयी बोलायच झाल तर, तो सैराट चित्रपटानंतर ‘एफ्यू’आणि ‘घर, बंदूक बिरयानी’ या चित्रपटात दिसला होता. (Akash Tosar breaks silence on viral photos with Rinku Rajguru)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हद्दच केली पार! उर्फीने कपडे न घालता फक्त गुलाबाच्या पाकळ्यांनी झाकले शरीर; फाेटाे एकदा पाहाच
तमन्ना भाटिया ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला करतेय डेट? व्हायरल झाले स्टायलिश फाेटाे

हे देखील वाचा