×

Video | अक्षय कुमारने देहरादुनमध्ये उघडपणे ओलांडला रस्ता, पण लोकांच्या कळायच्या आतच…

बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या देहरादुन आणि उत्तराखंडमधील मसूरीमध्ये त्याच्या आगामी ‘रत्शासन’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान, शूटिंगमधून वेळ काढून मिस्टर खिलाडी देहरादूूनच्या रस्त्यांवर फिरायला निघाला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, अक्षय कुमार रस्ता ओलांडताना दिसत आहे आणि त्याच्यासोबत कोणीही नाही. येथे तो खूप वेगाने निघून जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका पत्रकाराने शेअर केला आहे.

अक्षय कुमारसारखा सुपरस्टार सर्वसामान्य लोकांमध्ये पोहोचला, तर मोठी गर्दी जमते. पण असे काही घडले की, देहरादुनच्या राजपूर रोडवरील गांधी पार्कसमोर जेव्हा अक्षय कुमार रस्ता ओलांडताना दिसला, तेव्हा लोक त्याला ओळखूही शकले नाहीत. कारण खिलाडी कुमार सुसाट वेगाने रस्ता ओलांडून निघून गेला. मात्र कोणीतरी त्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद करून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. आता हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. (akshay kumar viral video from dehradun road is getting viral fast)

पण हा व्हिडिओ जरा नीट पाहिल्यावर, हा त्याच्या शूटिंगचा व्हिडिओ आहे असे वाटेल. कारण प्रोडक्शन टीमचे लोक जो कोणी शूट केला आहे, त्याला थांबवा म्हणून ओरडत आहेत. कारण अशाप्रकारे अक्षयचा चित्रपटातील लूक लीक होऊ शकतो.

रकुल प्रीत सिंग सुपरस्टार अक्षय कुमारसोबत ‘रत्सासन’ या चित्रपटात दिसणार आहे. हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. अक्षय कुमार रकुल प्रीत सिंगसोबत या चित्रपटासाठी बऱ्याच दिवसांपासून शूटिंग करत आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अक्षय कुमार शेवटचा ‘अतरंगी रे’ चित्रपटात दिसला होता आणि त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. त्याचबरोबर अक्षय यावर्षी त्याच्या अनेक मोठ्या चित्रपटांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्याकडे ‘बच्चन पांडे’, ‘रक्षाबंधन’ आणि ‘पृथ्वीराज’, ‘राम सेतू’, ‘गोरखा’ असे चित्रपट आहेत.

हेही वाचा :

Latest Post