अखेर प्रतीक्षा संपली; स्वप्नील जोशीच्या बहुप्रतिक्षित ‘समांतर २’ चा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज


मराठी सिनेसृष्टीचा ‘चॉकलेट बॉय’ या अर्थातच स्वप्नील जोशी चाहत्यांच्या लाडका अभिनेता आहे. चित्रपटातील त्याची प्रत्येक भूमिका रसिकांकडून खूप पसंत केली जाते. मराठी चित्रपट व रंगमंचावरून काम केल्यानंतर, त्याने हिंदी चित्रपटातही काम करून प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. तसेच आता त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार एन्ट्री मारलेली पाहायला मिळत आहे.

ओटीटीवर देखील स्वप्नीलला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याची ‘समांतर’ या वेब सीरिजने चाहत्यांची मने जिंकली. सोबतच समीक्षकांची देखील वाहवा मिळवली. उत्तम स्टारकास्ट, रंजक वळणं सोबतच कलाकारांची केमिस्ट्री याने हा सीझन हिट ठरला. काही दिवसांपूर्वीच या सीरिजच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच, ‘समांतर २’ ची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे प्रेक्षकही या नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते.

प्रेक्षकांना अधिक प्रतीक्षा करायला न लावता, निर्माते प्रेक्षकांसाठी ‘समांतर २’ चा टीझर घेऊन आले आहेत. हा टीझर एमएक्स प्लेअरवर रिलीझ केला गेला आहे. विशेष म्हणजे, ‘समांतर’ मध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा बोल्ड अवतार पाहायला मिळाला होता, जो रसिकांच्या पसंतीस उतरला. आता या नव्या सीझनमध्ये देखील तेजस्विनी पंडित आणि स्वप्नील जोशीचे बोल्ड सीन दाखवण्यात येणार आहेत. (amidst heightened anticipation swwapnil joshi starrer samantar returns its second season)

रंजक कथानक असलेल्या ‘समांतर २’ च्या टीझरला सोशल मीडियावर चाहत्यांचे खूप प्रेम मिळत आहे. मात्र या वेब सीरिजच्या ट्रेलरसाठी प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. तसेच, प्रेक्षकांची ही उत्सुकता अधिक वाढविण्यासाठी निर्मात्यांनी ‘समांतर २’ चा ट्रेलर २१ जून रोजी रिलीझ करण्याचे ठरवले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘शेरनी’ बनलेल्या विद्याचा परफॉर्मन्स पाहून प्रभावित झाले प्रेक्षक; सोशल मीडियावर बांधले जातायेत अभिनेत्रीच्या कौतुकांचे पूल

-नोहा फतेहीने विचित्र अंदाजात घातली बिकिनी; अभिनेत्रीला पाहून वरुण धवनही झाला लोटपोट

-अरर!! ड्रेस एवढा गच्च होतोय की उर्वशी रौतेलाला बसायला देखील होतोय त्रास, एका सेशनमध्ये उडाली फजिती


Leave A Reply

Your email address will not be published.