Sunday, September 8, 2024
Home टॉलीवूड तेलंगणा आणि आंध्र प्रदेश येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आला सोनू सूद; मुख्यमंत्र्यांनी शेयर केला व्हिडीओ

तेलंगणा आणि आंध्र प्रदेश येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आला सोनू सूद; मुख्यमंत्र्यांनी शेयर केला व्हिडीओ

आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. बॉलिवूड स्टार्सही पूरग्रस्तांना मदतीचा हात देत आहेत. ज्युनियर एनटीआर ते अल्लू अर्जुनपर्यंत, दक्षिण उद्योगातील अनेक स्टार्सनी सीएम रिलीफ फंडमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे जमा केले आहेत. गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारा अभिनेता सोनू सूदही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आला आहे आणि आपल्या स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही सोनूच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

अभिनेता सोनू सूदने काल बुधवारी एक व्हिडिओ जारी केला होता, ज्यामध्ये तो आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील पूरग्रस्तांना मदत करत  होता. अभिनेत्याने लिहिले की, ‘आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला पुरामुळे वाईट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, या गरजेच्या वेळी आम्ही सार्वजन त्यांच्यासोबत उभे आहोत.

 व्हिडीओमध्ये सोनू असे म्हणताना दिसत आहे की, पुरामुळे आंध्र आणि तेलंगणामधील अनेक लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांच्याकडे राहण्यासाठी जागा नाही, खायला काही नाही, आम्ही त्यांचे जीवन पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून जास्तीत जास्त मदत शक्य तितक्या लवकर तेथे पोहोचू शकेल.

अभिनेता सोनू सूदचा हा व्हिडिओ मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या टाइमलाइनवर शेअर केला आहे. त्यासोबत लिहिले आहे, ‘तुमचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. आमच्या लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आणि इतर असंख्य लोकांना असे करण्यास प्रेरित केल्याबद्दल माझ्या अंतःकरणापासून धन्यवाद. तुमची मदत आमच्या लोकांना त्यांच्या गरजेच्या वेळी खूप मदत करेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –  

गश्मीर महाजनी व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्या भूमिकेत फुलवंती ११ ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा