अभिनेता अंकित मोहन आणि अभिनेत्री रुची सवर्ण झाले आईबाबा


मनोरंजनविश्वात आनंदाच्या बातम्यांना जणू पूर्णच आला आहे. एकीकडे हिंदी, मराठीमधील अनेक कलाकार बोहल्यावर चढत आहे तर काहींनी त्यांच्या आयुष्यातील या सुखद वळणाला सुरुवात देखील केली. अनेक कलाकारांनी आईबाबा होणार असल्याची गोड बातमी दिली तर काही कलाकार आईबाबा झाले आहे. आता आईबाबा झालेल्या कलाकारांच्या यादीत अजून एका सेलिब्रिटी कपलची भर पडली आहे. अभिनेता अंकित मोहन आणि अभिनेत्री रुची सवर्ण हे आई बाबा झाले असून, रुचीने एका मुलाला जन्म दिला आहे.

अभिनेता अंकित मोहन आणि त्याची पत्नी अभिनेत्री रुचि सवर्ण यांनी आजवर अनेक हिंदी आणि मराठी मालिकांसोबतच सिनेमांमध्ये देखील काम केले असले तरी मराठीमध्ये देखील ही जोडी तितकीच लोकप्रिय झाली आहे. रुची आणि अंकित यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी रुची प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले होते. अंकिताने त्याच्या सोशल मीडियापोस्टमध्ये रुची आणि त्याचे काही फोटो पोस्ट करत लिहिले होते की, “शुभ प्रसंगी शुभ बातमी…. नवीन पाहुणा लवकरच येतोय”. त्यानंतर इंडस्ट्रीमधून आणि फॅन्सने त्यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव केला होता.

रुची तिच्या प्रेग्नन्सीच्या काळात खूपच सक्रिय होती. कामासोबतच, योग्य व्यायाम, वाचन करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करायचे देखील ती विसरत नव्हती. रुचीने काही काळापूर्वीच तिचे मॅटर्निटी फोटोशूट केले होते. या शूटमधील काही फोटो तिने आणि अंकिताने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून देखील शेअर केले होते.

‘घर आजा परदेसी’ या मालिकेत अंकित आणि रुची या दोघांनी एकत्र काम केले होते. याच मालिकेतून दोघांची मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले. पुढे दोघांनी २ डिसेंबर २०१५ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली होती. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘मन फकीरा’ या चित्रपटातून अंकितने मराठी मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!