Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड ‘तू नेहमीच आठवणीत राहशील…’, म्हणत अंकिता लोखंडेने सुशांतसोबतच्या जुन्या आठवणींना दिला उजाळा

‘तू नेहमीच आठवणीत राहशील…’, म्हणत अंकिता लोखंडेने सुशांतसोबतच्या जुन्या आठवणींना दिला उजाळा

बॉलिवूड मधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचे निधन होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. पण आजही त्याची आठवण सर्वांच्या मनात जागी आहे. आज त्याची आठवण काढून अनेक कलाकार सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर करत आहेत. यातच अंकिता लोखंडे हीने सुशांतसाठी तिच्या घरी हवन केला आहे. या सोबतच तिने सुशांत सिंगसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

अंकिता लोखंडेने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अंकिताने सुशांत सिंग सोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सुशांत मित्रांसोबत मज्जा मस्ती करताना दिसत आहे. या सोबतच त्याचा टेलिव्हिजन पासून बॉलिवूडपर्यंत प्रवास दाखवला आहे. या व्हिडिओमध्ये त्याचा कुत्रा देखील दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर तिने लिहिले आहे की, “१४ जून… हा आमचा प्रवास होता. फिर मिलेंगे चलते चलते.” यासोबत तिने तुटलेल्या हृदयाची ईमोजी पोस्ट केली आहे. (Ankita lokhande share a photo on social media with Sushant Singh Rajput)

या व्यतिरिक्त अंकिताने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो व्हिडिओ २०११ सालच्या दिवाळीतील आहे. या व्हिडिओमध्ये सुशांत आणि अंकिता एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओला एका कॅमेरात शूट केले आहे. यासोबतच तिथे अनेक लोक उपस्थित होते. या व्हिडिओ सोबत तिने लिहिले आहे की, “याच आठवणी सोबत सोडून गेलास. तुझ्यावर नेहमीच प्रेम केले जाईल. तू नेहमीच आठवणीत राहशील. दिवाळी २०११.”

पवित्र रिश्ता या मालिकेतून सुशांत सिंग आणि अंकिताला ओळख मिळाली. अंकिता आणि सुशांत अनेक वर्ष रिलेशनमध्ये होते. त्यानंतर काही कारणांनी त्यांचे ब्रेकअप झाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-यामी गौतमची बहीण सुरिलीने केला तिचा साज श्रृंगार; अभिनेत्रीने केला लग्नातील न पाहिलेला व्हिडिओ

-‘तुला प्रेग्नेंट राहायला आवडते का?’, म्हणणाऱ्या युजरची अभिनेत्रीने केली बोलती बंद; म्हणाली, ‘आता बास…’

-‘तुम्ही त्याचा टीआरपीसाठी वापर केला आणि…’, पवनदीपच्या परफॉर्मन्सवर कात्री चालवणाऱ्या निर्मात्यांवर भडकले चाहते

हे देखील वाचा