ऑलिम्पियन मीराबाई चानूच्या कानातल्यांची कहाणी ऐकून अनुष्का शर्मा झाली भावुक; पोस्ट शेअर करत केले कौतुक


बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला ऑलिम्पियन मीराबाई चानूने ऑलिम्पिक स्पेशल घातलेले कानातले आणि त्या मागची कहाणी खूपच आवडली आहे. मीराबाई चानूने शनिवारी (२४जुलै) ऑलिम्पिक खेळामध्ये वेटलिफ्टींग स्पर्धेत देशाची २१ वर्षाची प्रतीक्षा संपवून रौप्यपदकावर तिचे नाव कोरले आहे. महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाईने स्नॅच प्रकारात ८७, तर क्लीन ऍंड जर्क प्रकारात ११५ किलो वजन उचललं आहे. या दरम्यान तिने जे कानातले घातले होते, ते अनुष्का शर्मालाला खूपच आवडले आहे.

अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला मीराबाई चानूचे कानातले आणि त्या मागील कहाणीसाठी तिचे प्रेम व्यक्त केले आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीला मीराबाईचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून तिने मीराबाईला ‘ब्यूटी’ असे म्हटले आहे. यासोबतच तिने ऑलिम्पिक स्पेशल कानतल्यांचा देखील उच्चार केला आहे. ती म्हणाली की, “हे खूप सुंदर आहे.”

ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाईने घातलेले कानातले तिला तिच्या आईने गिफ्ट दिले होते. तिच्या आईने हे कानातले तिला पाच वर्षापूर्वी गिफ्ट केले होते. तिच्या आईने तिचे दागिने विकून हे कानातले तिला गिफ्ट केले होते. तिच्या आईची ही आशा होती की, हे कानातले तिच्या मुलीचे नशीब बदलणार आहेत. परंतु रियो २०१६ च्या खेळामध्ये हे शक्य झाले नाही. पण तिचे हे स्वप्न २०२१ मध्ये पूर्ण झाले आहे. (Anushka Sharma is fan of Mirabai chanu and likes her Olympics special earings and their story)

अनुष्का शर्माला जेव्हा ही कहाणी समजली तेव्हा ती खूपच भावुक झाली. एका आईची आपल्या मुलीप्रती असलेली ही आशा आणि प्रेम पाहून तिला खूपच आनंद झाला आहे. तिचा हाच आनंद तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मा या दिवसात तिची मुलगी वामिका सोबत क्वालिट टाईम घालवत आहे. नुकतेच वामिका सहा महिन्यांची झाली तेव्हा अनुष्का शर्माने तिच्यासोबत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पण त्यात वामिकाचा चेहरा नीट दिसत नव्हता. तिने वमिकाला‌ सोशल मीडियापासून लांब ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-महाराष्ट्रातील पूर परिस्थितीमुळे चिंतीत अमेय खोपकरांनी मारला बॉलिवूडला टोला; म्हणाले, ‘माझ्या राज्यात राहून…’

-स्वयंवर करूनही राहुल महाजन रमला नाही संसारात; तीन लग्न केलेल्या अभिनेत्यावर पत्नीने लावले होते घरगुती हिंसाचाराचे आरोप

-‘या’ सुपरहिट गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनमध्ये झळकणार सोनू सूद; पुन्हा मिळाली फराह खानची साथ


Leave A Reply

Your email address will not be published.