रंगीबेरंगी गाऊनमध्ये दिसली मराठीमोळी ‘अप्सरा’! सोनाली कुलकर्णीच्या ग्लॅमरस अदांवर भाळले चाहते

marathi apsara sonalee kulakarni shared her beautiful pictures in long colourful gawn


मराठी सिनेमाची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी, ग्लॅमरस लूकमधील तिचे एकामागून एक फोटो शेअर करतच असते. ‘हिरकणी’ फेम अभिनेत्री आपल्या स्टाईलिश अंदाजाने चाहत्यांनी मने जिंकण्याची एकही संधी सोडत नाही. सोशल मीडियावर बरीच सक्रिय असणारी सोनाली, सतत तिचे लेटेस्ट फोटोशूट आणि व्हिडिओ इंस्टाग्राम हँडलद्वारे चाहत्यांसमोर सादर करत असते.

सोनालीने नुकतेच काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती रंगबिरंगी लॉंग गाऊनमध्ये दिसली आहे. फोटोतील सोनालीच्या अदा पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल! यामध्ये सोनाली तिच्या घराच्या बाल्कनीमध्ये थांबून फोटोसाठी पोझ देताना दिसली.

सोनालीच्या या मनमोहक लूकला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे. तिचे चाहते फोटोवर लाईक्स आणि कमेंट्स करून, तिच्याप्रती त्यांचे प्रेम व्यक्त करताना दिसतायेत. या फोटोंना आतापर्यंत तब्बल ६१ हजाराहून अधिक युजर्सने लाईक केले आहे. तर कमेंट बॉक्समध्ये सोनालीच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले जात आहे. तसेच फोटो शेअर करत सोनालीने लिहिले की, “फोटोग्राफर मिस्टर बेनोडेकर यांच्या प्रेमासाठी.”

सोनाली ७ मे २०२१ रोजी, कुणाल बेनोडेकरसह रेशीमगाठीत अडकली आहे. त्यांनी दुबईमध्ये अगदी साध्या पद्धतीने लग्न उरकून घेतले. केवळ २ साक्षीदारांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता. ज्याचे फोटो शेअर करत, सोनालीने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती.

सोनाली कुलकर्णीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘झिम्मा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर, ‘छत्रपती ताराराणी’ आणि ‘फ्रेश लाईम सोडा’ हे आगामी चित्रपटही तिच्या खात्यात आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.