Thursday, July 18, 2024

अरे देवा! अनन्याच्या बर्थडे पार्टीत पॅपराझी धाडकन आपटला, पाहा व्हायरल व्हिडिओ

प्रसिद्ध स्टार किड आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे रविवारी (दि.30 ऑक्टाेबर)ला 24 वर्षांची झाली. या प्रसंगी अनन्याने मुंबईतील वांद्रे येथे एका छोट्या डिनर पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये तिची बेस्ट फ्रेंड शनाया कपूर, नव्या नवेली नंदा ते सहकलाकार सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासह अनेक स्टार किड्स आणि स्टार्स दिसले. अनन्याच्या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत आहेत. पण, या सगळ्यात ज्या स्टार किडची सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे शाहरुख खान याचा लाडका आर्यन खान.

बाॅलिवूड अभिनेत्री अनन्या (ananya panday) हिच्या बर्थडे पार्टीत आर्यन (aryan khan) याने डेनिम पँटसोबत प्रिंटेड टी-शर्ट घातलेला दिसला. आर्यन गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. दिवाळीच्या पार्टीपासून ते वाढदिवसाच्या पार्टीपर्यंत आर्यन सतत सगळीकडे आपली उपस्थिती दाखवत आहे. नुकताच आर्यन खान आणि अनन्या पांडेचा एक व्हिडीओ समोर आला हाेता, ज्याबद्दल असे म्हटले जात हाेते की, आर्यनने अनन्याकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र, आता आर्यन अनन्याच्या बर्थडे बॅशला पोहोचल्याने या दोन्ही स्टार किड्समध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या दरम्यान, जेव्हा अनन्या तिच्या पार्टीला निघू लागली, तेव्हा तिला एका पॅपराझींची काळजी करताना पाहिले गेले, जो अभिनेत्रीचा फोटो काढत असताना खाली पडला. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री डिनर पार्टीमधून बाहेर पडताना आणि तिच्या कारकडे जाताना दिसत आहे. यावेळी अभिनेत्रीचा फाेटाे काढण्यासाठी पॅपराझी तिच्या भाेवती जमले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

यावेळी अनन्याचा फोटो काढताना गर्दीतील एक कॅमेरामन घसरला आणि पडला, त्यामुळे अनन्याने लगेच मदतीसाठी उडी घेतली आणि म्हणाली, “सावध राहा,” त्यानंतर तिने पॅपराझींना उठण्यास मदत करण्याची ऑफर दिली. अनन्या पांडेचा हा व्हिडिओ सध्या साेशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
संपली प्रतीक्षा! ‘पुष्पा: द रूल’मधील अल्लू अर्जुनचा खास लूक आला समोर
‘कांतारा’चा बॉलिवूड रिमेक बनणार नाही! रिषभ शेट्टीने सांगितलं ‘हे’ मोठं कारण

हे देखील वाचा