‘बालवीर’मधील गोड चिमुरडी आता झालीय बरीच ग्लॅमरस, बिकिनी लूकने घातलाय इंटरनेटवर धुमाकूळ

सोनी टीव्हीवरील ‘बालवीर’ या कार्यक्रमाने चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. या कार्यक्रमाने लहान मुलांना तर अक्षरश: वेड लावले होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अनेक कलाकार आजही चर्चेत असतात. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ आणि किस्से पाहायला लहान मुलांना आवडते. सध्या या कार्यक्रमातील एक बाल कलाकार सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. कार्यक्रमात लहान मुलीच्या भूमिकेत दिसलेली ही चिमुरडी आता मोठी झाली असून, आपल्या बिकीनी लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

बालवीर कार्यक्रमाने त्या काळात सगळ्यांनाच वेड लावले होते. तुम्ही जर या कार्यक्रमाचे चाहते असाल, तर तुम्हाला बालवीरची मैत्रिण मेहर दालगीची व्यक्तिरेखा आठवत असेल. या शोमध्ये तिने एका सुंदर आणि निरागस मुलीची भूमिका साकारली होती. ही व्यक्तिरेखा साकारणारी मुलगी दुसरी कोणी नसून अनुष्का सेन (Anushka Sen) होती. मात्र, कार्यक्रमाची मेहर म्हणजेच अनुष्का आता केवळ मोठीच नाही तर खूप ग्लॅमरसही दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Anushka Sen (@anushkasen0408)

अनुष्का सेनचे अनेक फोटो तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पाहायला मिळतील. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या फोटोंद्वारे चाहत्यांना मोहित करते. सध्या ती मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. या सहलीतील अनेक फोटो तिने शेअर केले आहेत. काहींमध्ये ती घोड्यावर स्वार होताना दिसत आहे तर काहींमध्ये ती समुद्रावर वेळ घालवताना दिसत आहे. होळीच्या दिवशीही अनुष्का मालदीवमध्ये होती.

View this post on Instagram

A post shared by Anushka Sen (@anushkasen0408)

मात्र, या काळातही तिने सण साजरा करण्याची संधी सोडली नाही. तिने अनेक रंगीबेरंगी फोटो शेअर केले आहेत. तिचा बिकिनी लूकही अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. तिच्या या सर्व फोटोंवर चाहते खूप कमेंट करत आहेत आणि तिची प्रशंसा करत आहेत, तिच्या वाढत्या वयात तिच्या ग्लॅमरने सर्वजण मंत्रमुग्ध होत आहेत. विशेष म्हणजे आजही लोक तिच्या भूमिकेचे नाव म्हणजेच मेहर या नावानेच हाक मारतात.

अनुष्का सेनने गेल्या वर्षी रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्येही भाग घेतला होता. मात्र, तिला खरी ओळख २०१२ मध्ये आलेल्या ‘बालवीर’ या कार्यक्रमातून मिळाली होती. या कार्यक्रमातील तिच्या सहजसुंदर अभिनयावर सगळेच फिदा झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

Latest Post