‘खतरों के खिलाडी’ शोची ऑफर मिळताच ‘अशी’ होती श्वेता तिवारीची प्रतिक्रिया, मुलाखतीत म्हणाली…


मागच्या काही काळापासून टेलिव्हिजन क्षेत्रात फक्त आणि फक्त चर्चा आहे, ती लवकरच सुरु होणाऱ्या ‘खतरों के खिलाडी’ या शोची. लवकरच या शोचे ११ वे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नवीन पर्वाची सर्वच प्रेक्षकांना खूप आतुरता आहे. यावेळेस या शोमध्ये काय नवीन पाहायला मिळणार आहे, याची चर्चा खूप रंगताना दिसत आहे. या शोमध्ये या पर्वात श्वेता तिवारी, विशाल आदित्य सिंग, आस्था गिल, अर्जुन बिजलानी, निक्की तांबोळी, राहुल वैद्य, वरुण सूद, सना मकबूल, अभिनव शुक्ला, महक चहल, दिव्यांका त्रिपाठी, सौरभ राज जैन, अनुष्का सेन आदी कलाकार सहभागी होणार आहे. यामधील एक स्पर्धक श्वेता तिवारीने या शोसाठी कसा होकार दिला, याबद्दल एक किस्सा नुकताच मीडियामध्ये शेअर केला आहे.

श्वेता तिवारी टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात मोठी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. श्वेता तिवारीने सांगितले की, “मला या शोची ऑफर या आधी अनेकदा आली होती. पण मी नेहमी यासाठी नकार दिला. कारण हा शो करण्यासाठी माझी कधी हिम्मतच झाली नाही. यावेळेस मला हा शो पुन्हा ऑफर करण्यात आला. यावेळेस मी विचार केला की, खूप कमी लोकांना चांगले काम करण्याची संधी मिळते आणि यावेळेस जर मी नाही बोलले असते, तर पुढे ना माझे वय राहिले असते ना मला कोणी अशा हटके शोची ऑफर दिली नसती. आता मी ठरवले की, या वेळेस मी हा शो करणार आणि हा वेगळा अनुभव घेणार. मला वाटले नव्हते की, मी हे करेल मात्र मी हे करून परत आली आहे.”

या शोच्या शूटिंगदरम्यान श्वेताचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ती स्टंटदरम्यान रडताना दिसत होती. सोबतच या शोचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नुकतेच या शोची मीडिया लॉन्चिंग पार्टी देखील संपन्न झाली आहे. या पर्वाच्या शोचे संपूर्ण शूटिंग दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाउनमध्ये झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘एवढी नकारात्मकता आणता तरी कुठून?’ ‘सिडनाझ’बाबत पसरलेल्या बातम्यांवर सिद्धार्थचे उत्तर

-शिल्पा शेट्टी बराचद्या सापडलीय वादाच्या भोवऱ्यात; अंडरवर्ल्ड कनेक्शनचा होता आरोप, तर बोल्ड फोटोशूटमुळेही होती ती चर्चेत

-‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाच्या लाईन प्रोड्युसरने नैराश्यामुळे केली आत्महत्या; अनुपम खेर यांनी पोस्टद्वारे दिली माहिती


Leave A Reply

Your email address will not be published.