Tuesday, September 26, 2023

“कित्येक रात्री डोळ्यात पाणी…” बाईपण…च्या यशानंतर केदार शिंदेची ‘त्या’ खास दोन व्यक्तींसाठी केलेली पोस्ट व्हायरल

सध्या मराठी मनोरंजनविश्वात एकाच सिनेमाची चर्चा आहे आणि तो सिनेमा म्हणजे केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अमाप कमाई करत नवनवीन रेकॉर्ड बनवले आहे. मराठीमधील सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा म्हणून या सिनेमाने नावलौकिक कमावला आहे. प्रदर्शित होऊन दिवसांपेक्षा अधिक दिवस झाले असूनही सिनेमा हाऊसफुल्ल होत आहे. आज या सिनेमाचे सर्वत्र कौतुक होत असले, सिनेमात जोरदार कमाई करत असला तरी केदार शिंदे यांच्यासाठी हा प्रवास इतका सोपा नव्हता. अनेक मोठ्या अडचणींवर मात करत केदार यांनी हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहचवला आहे. याचबद्दल त्यांनी त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमधून भाष्य केले आहे.

केदार शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत ‘बाईपण भारी देवा’ या सानमच्या अडचणींबद्दल आणि त्याकाळात त्यांना भक्कम साथ दिलेल्या खास दोन व्यक्तीबद्दल लिहिले आहे. केदार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “२०१९ पासून #baipanbhaarideva या सिनेमाचा ध्यास घेतला होता. निर्माता मिळत नव्हता, त्यावेळीच्या कित्येक रात्री डोळ्यात पाणी यायचं. मनात असंख्य विचार. या सगळ्याला handle करण्याचं सामर्थ्य मिळालं ते स्वामींमुळे आणि या दोघींमुळे. आपण creative असतो तेव्हा संसार चालतो तो घरच्या गृहिणी मुळेच. बेला तर दोन जबाबदाऱ्या सांभाळते. घर आणि सिनेमा याची निर्मिती!! घरकी मुर्गी डाल बराबर समजून उपयोगाचं नाही. तो मान सन्मान दिलाच पाहिजे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

पुढे केदार शिंदे यांनी लिहिले. “तीने नेहमी मला धीर देण्याचं काम केलय. बायकांचं मन जाणून घेताना, कित्येक वेळा बायकोचं मन मी विसरून गेलो आहे. आणि माझी सना.. या सिनेमाच्या project report पासून सगळ्याची जबाबदारी तीने सांभाळली. या सिनेमाच्या निर्मिती प्रक्रियेत ती सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पडेल ते काम करत होती. हा सिनेमा पुर्ण होऊ शकला तो सना मुळे. ६ अभिनेत्रींना मेकअप रूम मधून सेटवर आणायचं महत्त्वपुर्ण काम ती करायची. यांच्या गप्पा थांबवून हे करणं किती अवघड आहे! हे इथे लिहून समजणार नाही. #महाराष्ट्रशाहीर हा नंतर केलेला सिनेमा. पण त्यात सना confidently भुमिका करू शकली ते या ६ अभिनेत्रींचा अभिनय पाहून! हा प्रवास खडतर होता, तरी आनंददायी होता. आज कोट्यावधी रुपये हा सिनेमा कमावतो आहे, त्याची एक क्रेझ निर्माण झाली आहे. पण कोट्यावधी रुपयांपेक्षा मोलाची माझी टीम, त्यामुळे हे घडलं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.”

दरम्यान बाईपण भारी देवा या सिनेमाने ४० कोटींची भारीभक्कम कमाई केली असून अजूनही सिनेमा तुफान गाजत आहे. सिनेमाने अनेक मोठ्या हिंदी चित्रपटांना पछाडत रेकॉर्ड कमाई केली आहे. या सिनेमात सहा महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकत त्या कशा एका कारणामुळे एकत्र येतात ते दाखवले आहे. वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, दीप परब, सुचित्रा बांदेकर, सुकन्या मोने, दीप्ती नवलकर या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे.

अधिक वाचा- 
ब्रेकिंग! अभिनेते महेश कोठारे यांना मातृशोक, सरोज अंबर कोठारे यांचे निधन
तब्बल 29 वर्षांनंतर काजोलने मोडला नो किसिंग रूल; ‘या’ अभिनेत्यांसोबत लिपलाॅक करतानाचा व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा