सलमान खानसोबत काम केलेली ही छोटी मुलगी झालीय आता मोठी, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल ‘अरे ही तर आपली मुन्नी

Bajrangi Bhaijaan fame Harshali Malhotra dance video viral


बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे सगळेच चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच लक्षात राहतात. पण त्यातील सगळ्यांच्या आवडीचा चित्रपट म्हणजे ‘बजरंगी भाईजान.’ सलमान खानच्या इतर चित्रपटांपेक्षा अत्यंत वेगळी कहाणी घेऊन आलेल्या या चित्रपटाने सर्वांच्याच मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटातील सलमान आणि मुन्नीचे बॉंडिंग प्रेक्षकांना खूप आवडले होते. या चित्रपटात मुन्नीचे पात्र निभावलेली अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा आता मोठी झाली आहे.

हर्षाली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती करीना कपूर खानच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

तिचा हा डान्स पाहून तिचे चाहते खूपच कौतुक करत आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हर्षालीने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. सगळेजण तिच्या डान्सचे आणि हावभावाचे कमेंट करून कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “मुन्नी इतकी मोठी झाली.” सन 2014 मध्ये बजरंगी भाईजान या चित्रपटानंतर हर्षाली कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही.

कबीर खान यांनी बजरंगी भाईजान या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात सलमान खान आणि हर्षाली सोबत करीना कपूर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी हे देखील होते. पाकिस्तानमधून आलेल्या लहान मुलीला तिच्या मायदेशी पोहोचवण्यासाठी सलमान खान त्याच्या जीवाची पर्वा न करता पाकिस्तानमध्ये कसा जातो, ही कहाणी या चित्रपटातून दाखवली आहे. मुन्नीला बोलता येत नसल्याने त्याचा हा प्रवास खडतर होता, पण शेवटी त्याने मुन्नीला तिच्या आई- वडिलांकडे सुपूर्त केली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अमिताभ बच्चन यांच्या बालपणीचे पात्र साकारून नाव कमावणारा ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता झाला अचानक गायब, आता करतो तरी काय?

-पत्नी आणि मुलींच्या जवळ राहण्यासाठी रणधीर कपूर होणार नवीन घरात शिफ्ट, आपल्या जुन्या घराबाबत उघड केले ‘हे’ गुपीत

-राधे चित्रपटातील किसींग सीनबाबत दिशा पटानीचा मोठा खुलासा, म्हणाली…


Leave A Reply

Your email address will not be published.