‘भारतरत्न पुरस्कार माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा’; अभिनेते नंदामुरी यांचे धक्कादायक विधान


कलाकार नेहमीच एक पब्लिक फिगर म्हणून ओळखले जातात. त्यांचे अनुकरण करणारे त्यांना आपले आदर्श मानणारे अनेक लोकं समजत असतात. त्यामुळेच कलाकारांना बोलताना नेहमी भान ठेऊन आणि विचार करून बोलावे लागते. कधी जर कलाकारांच्या तोंडून चुकीचा शब्द निघाला तर त्यांना खूप ट्रोल केले जाते. कलाकार देखील अनेकदा भावनेच्याभरात जास्त बोलून जातात आणि नंतर त्यांना त्या गोष्टीचा पश्चाताप देखील करायला संधी मिळत नाही. तामिळ अभिनेता असलेल्या नंदामुरी बाळकृष्ण यांनी नुकतेच एक विवादित वक्तव्य केले आहे. ज्यामुळे आता त्यांच्यावर चहुबाजुंनी टीका होत आहे.

तामिळ सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते असलेले नंदामुरी बाळकृष्ण हे नेहमीच त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. नुकतीच त्यांनी एका मोठ्या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. त्यांची ही मुलाखत सोशल मीडियावर आणि मनोरंजन विश्वात चांगलीच गाजत आहे. या मुलाखतीदरम्यान नंदामुरी यांनी एक नव्हे, तर दोन धक्कादायक विधानं केली आहे. त्यांनी त्यांच्या या मुलाखतीमध्ये देशाचा सर्वोच्च पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ‘भारतरत्न’ पुरस्कारावर देखील भाष्य केले आहे. (bharatratna equal to my fathers toenail nandamuri balakrishna)

या पुरस्कराबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, “भारतरत्न हा पुरस्कार माझ्या वडिलांच्या एन.टी.आर. यांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा आहे. माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या वडिलांना नाही, तर या पुरस्कारांना वाईट वाटले पाहिजे की ते आमच्याकडे नाही. सर्व पुरस्कार हे माझ्या पायाच्या धूळीसमान आहे. तेलगू चित्रपटसृष्टीत आमच्या परिवाराच्या योगदानाची बरोबरी कोणताच पुरस्कार करू शकत नाही.”

यासोबतच नंदामुरी यांनी ए.आर.रहमान यांच्याबद्दल म्हटले की, “मला नाही माहित कोण आहे ए.आर.रहमान. जो दहा वर्षात एकदा एक अल्बम देतो आणि त्याला ऑस्कर मिळतो.” लक्षवेधी बाब म्हणजे नंदामुरी यांच्या १९९३ सालच्या ‘निप्पू रव्वा’साठी पार्श्वसंगीत दिले होते. बाळकृष्ण यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, ते लवकरच त्यांचा आगामी तेलगू सिनेमा ‘अखंड’ चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘चमकणारी प्रत्येक गोष्ट सोने नसते…’, म्हणत ‘हिमॅन’ धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले दु;ख

-तुरुंगात राहूनही मोडला नाही राज कुंद्राचा माज; चौकशीमध्ये सहकार्य न केल्यामुळे पोलिसांनी…

‘मला माहितीये लोक माझ्या वडिलांचा तिरस्कार करतात…’; #meetoo बाबत आलिया कश्यपने केले तिचे मत व्यक्त


Leave A Reply

Your email address will not be published.