Tuesday, March 5, 2024

आकांक्षा दुबेने गळफास घेण्याच्या काही तासांपूर्वीच शेअर केला बाेल्ड व्हिडिओ, तुम्ही पाहल तर व्हाल थक्क

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी आत्म’हत्या केली आहे. आकांक्षाने वाराणसीमधील हॉटेलमध्ये रविवारी(दि. 26 मार्च)ला गळफास घेत जीवन संपवलं. आकांक्षा दुबे भोजपूरी मनोरंजनसृष्टीतील एक नावाजलेले नाव हाेते. तिच्या आत्म’हत्येमुळे कलाविश्वात खळबळ उडाली आहे.

साेशल मीडियावर रील्समधून प्रसिद्धी मिळवलेल्या आकांक्षा (akanksha dubey ) हिने वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी भोजपुरी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. तिच्या आत्म’हत्येच्या बातमीने चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. आकांक्षा सोशल मीडियावर नियमित सक्रिय असायची. आत्म’हत्या करण्याच्या काही तासांपूर्वीच तिने इन्स्टाग्रामवर एक रील व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री भोजपुरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अशात आता आत्म’हत्येनंतर आकांक्षाचा हा व्हिडीओ साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आकांक्षाचा जन्म मध्य प्रदेशातील मिर्जापूर येथे 21 ऑक्टोबर 1997 साली झाला होता. मात्र, तीन वर्षांची असताना ती मायानगरी मुंबईत आली होती. तिच्या आई-वडिलांना तिला आयपीएस अधिकारी बनवायचे होते, पण आकांक्षाची आवड नृत्य आणि अभिनय क्षेत्रात अधिक होती.

एका मुलाखतीदरम्यान भोजपूरी मनोरंजनसृष्टीत काम करणं सोपं नसल्याचं आकांक्षाने सांगितले हाेते. अशात काम मिळत नसल्याने आकांक्षा 2018मध्ये डिप्रेशनमध्ये गेली होती. यासाेबतच तिने भोजपुरी इंडस्ट्री साेडण्याचाही निर्णय घेतला हाेता. मात्र, आईच्या सांगण्यावरुन ती पुन्हा काम करण्यास तयार झाली होती. आकांक्षाने अनेक दमदार चित्रपटांत काम केलं आहे, ज्यामध्ये ‘वीरों के वीर’ व ‘कसम पैदा करने वाले की 2’ यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. म्हत्वाचे म्हणजे आज रविवार (दि. 26 मार्च)ला आकाक्षांचे भाेजपूरी अभिनेता पवन सिंगसाेबत ‘आरा कभी हारा नही’ हे गाणंही प्रदर्शित झालं आहे.(bhojpuri actress akanksha dubey shared video few hours ago before suicide )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी वाराणसीतील हॉटेलमध्ये लावून घेतला गळफास

मिसकॅरेजनंतर स्मृती इराणी दुसऱ्याच दिवशी परतली कामावर; एकताला मेडिकल रिपोर्ट्स दाखवत म्हणाली, ‘भ्रूण राहिलं…’

हे देखील वाचा