गुलाबी रंगाच्या साडीत ‘छम्मक छल्लो’ गाण्यावर थिरकली ‘ही’ अभिनेत्री, बोल्ड अंदाज पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

Bhojpuri actress prachi singh dance on chhammak chhallo song, video get viral


भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्राची सिंग आपल्या हॉट अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होत असतात. तसं पाहायला गेलं तर प्राचीचे इंस्टाग्रामवर 8000 पेक्षाही जास्त फॉलॉवर्स आहेत. ती आपल्या फोटोमुळे चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करते. नुकताच 5 मार्चला प्राचीने इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा आणि शाहरुख खानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये प्राची शाहरुख खानच्या ‘रावण’ या चित्रपटातील ‘छम्मक छल्लो’ या गाण्यावर ठुमके मारताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी घातली आहे. अत्यंत बोल्ड अंदाजात तिने डान्स केला आहे. या गाण्यातील प्राचीच्या केवळ डान्स स्टेप्स नव्हे तर तिचे हावभाव देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तिने हा व्हिडिओ शेअर करत ‘छम्मक छल्लो’ हे कॅप्शन दिले आहे.

प्राचीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती ‘मेरे प्यार से मिला दे’ या चित्रपटात किशनच्या विरुद्ध मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘चंदन सिंग’ हे करत आहेत. या चित्रपटात अनुप अरोरा, लोटा तिवारी, संचिता बॅनर्जी हे कलाकार दिसणार आहेत. या व्यतिरिक्त प्राची ‘पांच मेहरिया’ या चित्रपटात देखील काम करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-जब्याच्या शालूनं वेधलं चाहत्यांचं लक्ष! एकाच व्हिडिओत झळकली दोन वेगळ्या रुपात

-मुंबईचा ‘डॅडी’ बनणार आजोबा! मुलीच्या डोहाळे जेवणाचा व्हिडिओ व्हायरल

-जस्टीन बीबरच्या एक्स गर्लफ्रेंडचं नवीन गाणं रिलीझ, ३ दिवसात मिळाले ४५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.