टोकियो ऑलिंपिक २०२१: भारतीय खेळाडूंना प्रोत्साह देण्यासाठी भोजपुरी कलाकारांनी बनवले गाणे; टिझर रिलीझ


भारत हा एक असा देश आहे, जिथे खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. क्रिकेट असो किंवा फुटबॉल, हॉकी असो किंवा कब्बडी प्रत्येक खेळाचा इथे भरभरून आनंद घेतला जातो. सामान्य जनतेप्रमाणेच चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील खेळाबाबत खूप उत्साही असतात. ऑलिम्पिक आल्यावर हे कलाकार खेळाडूंना उभारी देण्यासाठी कुठेच कमी पडत नाही. मग ते बॉलिवूड कलाकार असो, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील असो किंवा भोजपुरी चित्रपटसृष्टीतील असो. सगळेजण भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात. नुकतेच भोजपुरी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी टोकियो ऑलिंपिक 2021 मध्ये भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एक गाणे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाण्याचे टायटल आहे ‘जीतेगा मेरा इंडिया’ असून या गाण्याचा टिझर प्रदर्शित झाला आहे. (Bhojpuri stars made jitega mera india song for tokiyo Olympics 2021 for champions)

हा टिझर सर्वांनाच खूप आवडला आहे. या छोट्याशा टिझरमध्ये भोजपुरी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार दिसत आहेत. या टिझरमध्ये भोजपुरी सुपरस्टार आणि बीजेपी खासदार रवी किशन, दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ, खेसारीलाल यादव, पवन सिंग, काजल राघवानी, आम्रपाली यांसारखे कलाकार दिसत आहेत. ‘जीतगा मेरा इंडिया’ या गाण्याचा टिझर वीवाईआरएल या भोजपुरी यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित केला आहे.

‘जीतेगा मेरा इंडिया’ या गाण्याला रितेश पांडे, शिवम बिहारी, रीनी चंद्रा, मोहन राठोड आणि विनय विनायक यांनी मिळून गायले आहे. या गाण्याला विनय विनायक आणि पेन्ड त्रिदिब रमण यांनी मिळून कंपोज केले आहे. भोजपुरी कलाकारांनी या गाण्याला टोकियो ऑलिंपिक 2021 मधील खेळाडूंचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या अंदाजात गायले आहे.

या गाण्यासाठी प्रेक्षक खूप उत्साहित आहेत. या गाण्याचा केवळ टिझर प्रदर्शित झाला आहे, तरीही या गाण्याला 13 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सगळेजण या गाण्याचे खूप कौतुक करत आहेत. हे गाणे यूट्यूबवर पाचव्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. आपल्या सगळ्या आवडत्या कलाकारांना एकत्र एका मंचावर पाहणे हे कितीतरी प्रेक्षकांचे स्वप्न असते. जे स्वप्न या गाण्याने पूर्ण केले आहे. या टिझरनंतर आता प्रेक्षक या पूर्ण गाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

काय सांगता! ‘बिग बॉस १५’ टीव्हीवर होणार बॅन? सलमान खानने दिली हिंट

-आम्ही घेतली कोरोनाची लस! कपिल शर्माने संपूर्ण टीमचे केले व्हॅक्सिनेशन; शो पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला

-प्रिया वारियरचा देशात नाही तर परदेशात डंका! साडी नेसून रशियाच्या रस्त्यांवर केला भन्नाट डान्स


Leave A Reply

Your email address will not be published.