खेसारी लाल यादव अन् ऋतु सिंगचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला; मिळाले लाखो हिट्स


भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार खेसारी लाल यादव या दिवसात खूपच धमाल करताना दिसत आहे. एका नंतर एक अशी अनेक सुपरहिट गाणी देऊन तो भोजपुरी संगीत क्षेत्राला एका वेगळ्याच उंचीवर पोहोचवत आहे. एकीकडे खेसारी लालचे सोशल मीडियावरील फॅन फॉलोविंग, तर दुसरीकडे त्याच्या गाण्यांच्या लोकप्रियतेमुळे सध्या त्याचे नाव प्रत्येकाच्या ओठावर आहे. अशातच त्याचे आणखी एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. खेसारीच्या ‘बाप जी’ चित्रपटातील या गाण्याचे नाव ‘लव्ह वाला डोस’ आहे.

या व्हिडिओमध्ये खेसारी लाल आणि ऋतु सिंगची केमिस्ट्री पाहण्याजोगी आहे. या गाण्याचा फर्स्ट लूक देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा लूक पाहून त्याचे चाहते दीवाने झाले होते. सगळेजण या गाण्याची उत्सुकतेने वाट पाहत होते. या रोमँटिक गाण्यामधील खेसारी लाल आणि ऋतु सिंगने जबरदस्त डान्स केला आहे. जो सर्वांना खूपच आवडला आहे. सोशल मीडियावर सर्वत्र या जोडीचे कौतुक होत आहे. खेसारी लाल यादव आणि आलका झा यांनी हे गाणे गायले आहे. आझाद सिंगने या गाण्याचे लिरिक्स लिहिले आहे. तर ओम झाने या गाण्याला संगीत दिले आहे. हे गाणे वर्ल्ड वाईड रेकॉर्ड भोजपुरीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरून प्रदर्शित केले आहे. या गाण्याला आतापर्यंत ४ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

या गाण्याचे बोल आणि संगीत सर्वांना खूपच आवडत आहेत. या गाण्यात ऋतु सिंग खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. तसेच खेसारी लाल देखील खूप हँडसम दिसत आहे. ऋतुचा कॉस्च्युम देखील सर्वांना खूपच आवडला आहे. या गाण्यातील खास गोष्ट ही आहे की, या गाण्याच्या शेवटी ‘बाप जी’ या चित्रपटाचा ट्रेलर दाखवला आहे. हे सर्व भोजपुरी प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज आहे.

वर्ल्ड वाईड रेकॉर्ड भोजपुरीच्या यूट्यूब चॅनल वरून ‘बाप जी’चा ट्रेलर देखील प्रदर्शित केला होता. या ट्रेलरला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्यामध्ये एका बाप- लेकाच्या नात्याची एक अनोखी कहाणी दाखवली आहे. या चित्रपटात खेसारीलालच्या वडिलांची भूमिका मनोज टायगर यांनी निभावली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ये परदा हटा दो’ गाण्यावरील मानसी नाईकच्या एक्सप्रेशन्सवर तिचा पतीही झाला फिदा; कमेंट करत म्हणतोय, ‘ये चांद…’

-उर्वशीच्या पोटात एका व्यक्तीने दणादण मारल्या बुक्क्या; त्रास होत असूनही अभिनेत्रीने गपगुमान केले सहन

-जेनेलियासोबत रितेश करत होता रोमान्स; तिचा हात समजून केले ‘या’ दिग्दर्शकाच्या हातावर किस, पुढं काय झालं पाहाच…


Leave A Reply

Your email address will not be published.